बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

झुम कॉल सुरू असतानाच बड्या राजकीय नेत्याची पत्नी आली नग्नावस्थेत, व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली | जगभरात कोरोनाने थैमान घातल्यानंतर ऑनलाइन मिटींग्स होण्यास सुरुवात झाली. तसेच संपर्क टाळण्यासाठी झूम, गूगल मीट यासारखे ॲप्स वापरून राजकीय बैठका तसेच इतर सर्व बैठका या ऑनलाईन पद्धतीने होऊ लागल्या. अशीच एक बैठक सुरु असताना एक धक्कादायक प्रकार घडला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या एका मोठ्या नेत्याची बायको झूम मीटिंगमध्ये नग्नावस्थेत कॅमेरा समोर दिसल्याने एकच खळबळ उडाली.

दक्षिण आफ्रिकेचे संसदीय समितीचे सदस्य केपटाउनमधील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन त्यासंदर्भात कशाप्रकारे मदतकार्य सुरू आहे, याची माहिती देत होते. त्याच वेळेला त्यांची पत्नी बाथरूममधून आंघोळ करून नग्नावस्थेत कॅमेरासमोर दिसल्याने एकच खळबळ माजली.

सदरील झूम मीटिंगमध्ये दक्षिण आफ्रिकेतील 23 मोठे नेते सहभागी होते. यावेळी बोलत असताना संसदीय समितीच्या सदस्यांची बायको काही काळ नग्नावस्थेत कॅमेरासमोर दिसल्याने आयोजकांनाही बैठक स्थगित करावी लागली. तसेच यासंदर्भातला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. समितीच्या प्रमुखांनी या सदस्याला चालू मीटिंगमध्येच खडेबोल सुनावले आणि हा काही तुमचा पहिला प्रसंग नाही, या आधीही अशा घटना घडल्या असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं. त्याबरोबरच आपण लाईव्ह टीव्हीवर असल्याचं भान बाळगण्याचंही त्यांनी संबंधित सदस्याला बजावलं. त्यानंतर त्या सदस्याने सर्वांची हात जोडून माफी मागितली आणि मागे काय सुरू आहे याबद्दल मला खरंच माहिती नव्हतं आणि जे झालं ते अनावधानाने झालं असं सांगितलं.

संबंधित प्रकरणात माध्यमांशी बोलताना या सदस्याने ऑनलाईन तंत्रज्ञान हे आमच्यासाठी नवीन असून त्यासाठी योग्य ते प्रशिक्षण आम्हाला देण्यात आले नाही, तसेच माझं घर छोटं असल्यामुळे वेगळ्या रूमचीही व्यवस्था नसल्याने हा सगळा प्रकार घडला असल्याचं त्यांनी सांगितलं. 10 वाजता संपणारी बैठक 10 वाजल्यानंतरही सुरू होती आणि माझी बायको बाथरूममधून आली तेव्हा ऑनलाईन मीटिंग सुरू आहे याची तिला थोडीशीही कल्पना नसल्याने हा सर्व प्रकार घडला असल्याचं त्यांनी सांगितलं.

पाहा व्हिडीओ –

थोडक्यात बातम्या – 

एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दिलासादायक

मोठी बातमी! महाराष्ट्रात लाॅकडाऊन अटळ; वृत्तपत्र संपादकांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

दहावीच्या विद्यार्थिनीवर गॅंगरेप करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घातली गोळी!

‘विषाणू ऐवजी ‘वसुली’ टार्गेट ठेवलं आणि महाराष्ट्राचं वाटोळं झालं’

कोरोनाची दुसरी लाट सर्वात खतरनाक, मुंबईची दिवसभराची आकडेवारी अत्यंत धक्कादायक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More