Top News

नरेंद्र मोदी पुन्हा निवडून यावेत ही पाकिस्तानी लष्कराची इच्छा- क्रिस्टीन फायर

नवी दिल्ली | मी हे सातत्याने सांगत आहे… हल्ल्याचा संबंध थेट भारतामध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीशी आहे. मोदी पुन्हा निवडून यावेत ही पाकिस्तानी लष्कराची आणि गुप्तचर यंत्रणांची इच्छा आहे, असा खळबळजनक दावा दक्षिण आशियासंबंधीच्या सुरक्षा विशेषतज्ञ प्रोफेसर क्रिस्टीन फायर यांनी केला आहे.

क्रिस्टीन फायर यांच्या मते या हल्ल्याचा थेट संबंध निवडणुकांशी आहे. या कारवाईनंतर मोदी पुन्हा निवडून आले तर त्याचा फायदा पाकिस्तानला होईल.

पाकिस्तानच्या दृष्टीकोनातून पाहिलं तर काही कट्टर पंथीय मारले गेल्याने त्यांच्या लष्करी  अजेंड्यावर काहीही परिणाम होणार नाही मात्र भारतामध्ये नरेंद्र मोदींचा विजय सुनिश्चित करण्यासाठी हल्ला करणं पाकिस्तानच्या गरजांशी अगदी सुसंगत आहे, असं मत फायर यांनी व्यक्त केलंय.

या हल्ल्यापूर्वी लोकसभा निवडणुकाचं चित्र काय असेल याचं चित्र पूर्णपणे वेगळं होतं आता मात्र मोदांचा विजय निश्चित आहे, असं एकंदरित विश्लेषण प्रोफेसर क्रिस्टीन फायर यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘मेरा बुथ सबसे मजबूत’ म्हणत पंतप्रधान मोदींनी साधला भाजप कार्यकर्त्यांशी संवाद, विरोधी पक्षांनी सोडलं टीकास्त्र

पाकिस्तान अभिनंदनला उद्याचं भारताकडं सोपवणार; इम्रान खान यांची घोषणा

प्रशांत परिचारक यांचं निलंबन ठेवलं कायम

पाकिस्तानला घरचा आहेर! ‘पाक’च्या माजी पंतप्रधानाची नात इमरान खानला म्हणते….!’

अटी-बीटी काही नाही, गप्प अभिनंदन यांना सोडा, नाहीतर…!; भारताने ठणकावलं

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या