बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाबो! रिलेशनमध्ये येताना महिलेनं 17 पानी काॅन्ट्रॅक्ट लेटर करत केल्या ‘या’ रोमँटिक मागण्या!

नवी दिल्ली | एखाद्या बिझनेस डीलमध्ये जाण्याआधी त्याचे काही नियम असतात. हे नियम कटाक्षाने पाळले जावे यासाठी काॅन्ट्रॅक्ट बनवण्यात येतं. मात्र एखाद्या नात्यामध्ये काॅन्ट्रॅक्ट झाल्याचं आपण कधी ऐकलं नसेल, परंतू असं प्रकरण समोर आलं आहे की ज्यामध्ये रिलेशनशिपमध्ये येण्याआधी काॅन्ट्रॅक्ट केलं होतं. एका महिलेने प्रेमसंबंधात जाण्याआधी जोडीदाराला काही मागण्या करत 17 पानी काॅन्ट्रॅक्ट पेपर दिले आहेत.

काही दिवसांपुर्वीच 21 वर्षीय तरुणी एनीन एका टाॅक्सिक नात्यातून बाहेर आली. त्यानंतर एनीनला नात्यात अडकण्याची भिती वाटत होती. मात्र तिची भेट 23 वर्षीय मायकलसोबत ‘टिंडर’ या अॅपवर झाली. मागील नात्यात झालेल्या गोष्टी पुन्हा नको असल्याने एनीनने 17 पानांचं काॅन्ट्रॅक्ट मायकलला दिलं. यामध्ये तिने काही मागण्या केल्या आहेत.

या काॅन्ट्रॅक्टनुसार मायकल आणि एनीन जेवायला बाहेर गेल्यावर मायकलनेच पैसे भरायचे. तसेच काॅन्ट्रॅक्टनुसार मायकलला आता महिन्यातून दोनवेळा एनीनला फुलं द्यायचीत आणि आठवड्यातून पाच वेळा मायकलला वर्कआऊटसुद्धा करावा लागणार आहे.

दरम्यान, आपल्या नात्याबाबत बोलताना एनीनने आपलं नातं बिझनेसडीलसारखं असल्याचं सांगितलं आहे. तसेच त्यांच्या नात्यात येणाऱ्या समस्या देखील दोघे बिझनेस समस्यांसारखेच सोडवतात. विशेष बाब म्हणजे हे नातं असंच कायम राहणार असून या काॅन्ट्रॅकमध्ये लिहिल्यानुसार दोघे एकमेकांना कधीच दोष देणार नाहीत.

थोडक्यात बातम्या-

“नात्यांचे संदर्भ बदलत असतात, अगोदर महागाई चेटकीण वाटायची आज ती प्रेयसी झालीये”

‘रितेश देशमुखच्या मुलांनी म्हटली गणपतीची आरती, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

लसीचा एकही डोस न घेतलेल्या ‘या’ आमदाराचं कोरोनामुळे निधन!

राज्याला पुढील 4-5 दिवस पाऊस झोडपून काढणार, वाचा हवामान खात्याचा अंदाज

अभिनेता साई धरम तेज अपघातात गंभीर जखमी; अपघाताचा व्हिडीओ आला समोर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More