बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् बायकोने नवऱ्याला टेम्पोला बांधून एक किलोमीटर फरफटत नेलं; पाहा व्हिडिओ

सुरत | गुजरातच्या सुरतमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. महिलेनं केलेल्या अतिशय अमानुष कृत्याने परीसरात एकच खळबळ उडाली आहे. महिलेेने तिच्या भावाच्या मदतीने मन हेलावून टाकणारा प्रकार केला आहे. महिलेनं स्वतःच्या पतीला दोरीच्या सहाय्यानं टेम्पोच्या मागे बांधून निर्दयीपणे पतीला जवळपास एक किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय.

या व्यक्तिवर वारंवार दारू पिऊन आपल्या पत्नीला मारहाण आणि शिवीगाळ करायचा आरोप आहे. पतीला चांगलीच अद्दल घडवण्यासाठी भावासोबत मिळून पत्नीने हा सगळा प्रकार केल्याचं कळतंय. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पत्नीच्या या अमानुष कृत्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

पती दारुच्या नशेत घरी आल्यावर पत्नाने त्याचे हात दोरीने टेम्पोच्या मागे बांधले, आणि रस्तावर जवळपास एक किलोमीटर त्याला फरफटत नेलं. ही घटना नागरिकांनी पाहिल्यानंतर लोकांनी त्याची सुटका केली. त्याच्यावर उपचार सुरु असून व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे.

पोलिसांनी संपू्र्ण घटनेचा तपास करुन संबंधित व्यक्तीच्या पत्नी आणि भावाविरोधात कारवाई सुरू केली आहे. या घटनेची सगळीकडे चर्चा रंगत आहे.

 पाहा व्हिडिओ –

 

 

थोडक्यात बातम्या-

गॅस, इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक; पेट्रोलपंपावरील मोदींच्या बॅनरखाली ‘चूल मांडा’ आंदोलन करणार

मोठी बातमी! खासगी रुग्णालयांमध्ये ‘इतक्या’ रुपयांत मिळेल कोरोनावरील लस

मोहन डेलकरांच्या आत्महत्येबाबत संजय राऊतांचा गौप्यस्फोट, म्हणाले..

…म्हणून उदयनराजेंनी राज ठाकरेंची भेट घेतली; मनसेनं सांगितली अंदर की बात

गजा मारणेनंतर पोलिसांची नजर आता पुण्यातील ‘या’ खतरनाक टोळीवर!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More