“संजय राऊत जो शब्द वापरतात तो शब्द या सरकारसाठी वापरावा लागेल”
मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात भाजप(BJP) विरूद्ध शिवसेना (Shiv Sena) असा सामना रंगलेला पहायला मिळत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरून भाजपवर अर्निवाच्य शब्दात टीका केली होती. त्यातच आता राज्यातील अनेक मुद्यांवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे.
कोरोना काळामध्ये महाविकास आघाडी सरकारने बारमालकांचं मोठं भलं केलं. कोरोनाच्या काळात दुर्देवाने वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना 5 हजार रूपयांची मदत करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली होती. मात्र, हे सरकार इतकं नालायक निघालं की, वेश्यांना द्यायचे पैसे त्यांनी आपल्या नातेवाईकांना दिले, असा घणाघात देवेंद्र फडणवीसांनी केला.
वेश्यांना द्यावयाच्या पैशांवरही डल्ला मारणाऱ्यांना काय म्हणतात हे मी सांगणार नाही, तो शब्द संजय राऊत नेहमी वापरतात. तो शब्द या सरकारसाठी वापरावा लागेल, अशी जहरी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. इतकचं नाही तर विदेशी दारूवरचा कर अर्धा करण्याचं काम या सरकारने केलं आहे, अशी तोफ फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर डागली आहे.
दरम्यान, या महाराष्ट्रात बेवड्याचं सरकार आलं. सरकारला बेवड्याचं हित जास्त आहे. या सरकारने बेवड्यांना मदत केली आहे. महाविकास आघाडी सरकारने सर्वसामान्यांना मदत केली नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
थोडक्यात बातम्या-
प्रवीण दरेकरांची पोलिसांकडून तीन तास चौकशी, बाहेर येताच दरेकरांचा सरकारवर हल्लाबोल
“मनसे बिनबुडाची झालीये, तिला बुडही नाही आणि शेंडाही नाही”
“न्यायालयाने भोंगे खाली उतरावायचे आदेश दिले आहेत त्याचं पालन करा आणि मग…”
अभिनेत्री सोनम कपूरचे बेबी बंप फ्लाॅन्ट करताना फोटो व्हायरल, पाहा फोटो
कडाक्याच्या उन्हात अवकाळी पावसाचं सावट, पुढील 4,5 दिवस महत्त्वाचे
Comments are closed.