कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मंत्रालयातील ‘या’ विभागांमध्ये चालणार दोन शिफ्टमध्ये काम
मुंबई | कोरोनाची साखळी तोडण्यासाठी स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून कठोर निर्बंध लावण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील जलसंधारण विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा बदलल्या आहेत. मंत्रालयातील जलसंधारण विभाग दोन शिफ्टमध्ये काम करणार आहे.
मंत्रालयात येणारे बरेच कर्मचारी हे लोकल ट्रेन, बस यांसारख्या सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करतात. तेव्हा गर्दीत कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे एकाच वेळी अनेक कर्मचाऱ्यांनी एका शिफ्टमध्ये काम करण्यापेक्षा दोन शिफ्टमध्ये काम कलेलं योग्य राहील, असं जलसंधारण विभागान सांगितलं आहे. सोबतच, शासकीय कार्यालयात सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं. तसच गर्दी टाळण्यासाठी, उपाय म्हणून शासकीय कार्यालयातील उपस्थिती नियंत्रित करण्याबाबतच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
या सूचनेप्रमाणे मृद आणि जलसंधारण या प्रशासकीय विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कार्यालयीन उपस्थितीच्या वेळेत बदल करण्यात येणार आहे. त्यानुसार जलसंधारण विभागातील कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम करणार आहे. यातील एक शिफ्ट ही सकाळी 8 ते सायंकाळी 4 पर्यंत असणार आहे. तर दुसरी शिफ्ट ही दुपारी 12 ते रात्री 8 पर्यंत असणार आहे.
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाची सहावी बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठं विधान केलं, कार्यालयीन वेळच्या बाबतीत पारंपरिक 10 ते 5 ही मानसिकता बदलायला हवी. प्रत्येकाच्या कार्यालयीन वेळेचं नियोजन करणं आवश्यक आहे, त्यासाठी केंद्रानं राष्ट्रीय धोरण आखायला हवं. ऑफिसच्या वेळांची विभागणी करा. त्याचसोबतच त्रिसूत्री पाळा, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं.
थोडक्यात बातम्या –
मोठ्या मनाचा माणूस! घरकाम करणाऱ्या तरुणीच्या घरी सांत्वनाला पोहोचले जॅकी श्रॉफ
ममता बॅनर्जींचा भाजपवर बूमरॅंग; दिला ‘हा’ मोठा धक्का
मोठी बातमी! पुण्यापाठोपाठ ‘या’ जिल्ह्यातील शाळा देखील 31 मार्चपर्यंत राहणार बंद
“पुण्यात 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोना लस द्या”
धक्कादायक! एकाच कुटुंबातील 5 जणांनी फाशी घेत संपवलं जीवन
Comments are closed.