बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना लसीला विरोध करणाऱ्या ‘या’ माॅडेलची मृत्यूशी झूंज; लोकांना केलं लस घेण्याचं आवाहन

मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात कोरोना लसीकरण सुरु करण्यात आलं आहे. तरी अनेक लोकांचा कोरोना लसवर विश्वास नाहीये. यामुळे अनेकांनी आपण लस घेणार नसल्याचं म्हटलं आहे. मात्र असं करणं अतिशय धोकादायक ठरु शकतं.

43 वर्षीय हॉलीने (Holly McGuire) कोरोनाची लस आल्यानंतर तिला विरोध केला होता. यादरम्यान, तिला दोनदा कोरोनाची लागण झाली. कोरोनामुळे तिच्या फुफ्फुसांवर वाईट परिणाम झाले. त्यामुळे तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. तसेच तिला त्यावेळी कोरोना लस घ्यावी लागली.

कोरोनाची लागण झाल्यानंतर हाॅलीला निमोनीया देखील झाला. सहा आठवडे रुग्णालयात उपचार केल्यानंतर तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यानंतर आता तिने लोकांना लस घेण्याचं आवाहन केलं आहे.

दरम्यान, सुरुवातीला हॉलीने लसीला विरोध केला होता. यावेळी तिने मी ध्रूमपान करत नाही, व्यायाम करते, त्यामुळे मला कोरोनाच होणार नाही असं म्हटलं होतं. मात्र आता तिला कोरोनाचं संकट किती मोठं आहे हे चांगलंच समजलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मुंबईत विनामास्क फिरणाऱ्यांकडून आतापर्यंत वसूल करण्यात आला ‘इतक्या’ कोटींचा दंड

प्रत्येक भारतीयाला मिळणार हेल्थ कार्ड, पंतप्रधान मोदी करणार आयुष्मान डिजिटल मिशनचा प्रारंभ

विदर्भ-मराठवाड्याच्या बुलेट ट्रेनसाठी मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानांना पत्र, म्हणाले…

तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांची आज ‘भारत बंद’ची हाक!

SBI सारख्या चार ते पाच मोठ्या बॅंकांची देशाला गरज- निर्मला सीतारामन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More