पुणे महाराष्ट्र

वाढदिवसाचा केक कापून तरुण झाला फरार; पोलिसांनी मित्रालाच ठोकल्या बेड्या!

पुणे | दापोडी येथे तरुणांनी कोयत्याने केक कापून वाढदिवस साजरा केल्याचा प्रकार समोर आला आहे. या सर्व प्रकरणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

भोसरी पोलिसांनी या प्रकरणी उशिरा का होईना मात्र गुन्हा दाखल करून घेतला आहे. मात्र अद्याप मुख्य आरोपी फरार आहे. तर त्याच्या मित्राला पोलिसांनी अटक केली आहे.

समीर सियाज बागसिराज आणि सोहेल शेख अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. आरोपी समीर याला भोसरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

सोहेल आणि समीर हे दोघे ही कोयत्याने केकचे तुकडे करताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत. केक कापून झाल्यानंतर कोयता दापोडीच्या बस स्थानकात लपवून ठेवण्यात आला. या सर्व घटनेचा व्हिडिओ समोर आला असून भोसरी पोलीस बर्थडे बॉयचा शोध घेत आहेत.

थोडक्यात बातम्या-

“शिवसेना बाळासाहेबांची शिकवण विसरली, संपूर्ण पक्ष शरद पवारांपुढे लीन झालाय”

दिल्लीत सुरू असलेलं आंदोलन देशभर पसरलं पाहिजे- अण्णा हजारे

कृषीमंत्री असताना पवारांनी कृषी कायद्यासंबंधी लिहिलेल्या ‘त्या’ पत्रावर केला खुलासा; म्हणाले…

“कृषी कायदा बदलणार नाही, अशी घोषणा करणारे चंद्रकांत पाटील देशाचे पंतप्रधान की कृषीमंत्री?”

देशातील शेतकरी आंदोलनादरम्यान केरळ सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या