बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तरुणानं सेक्स पॉवर वाढवण्याच्या गोळ्या घेतल्या, मात्र त्यानंतर घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

बंगळुरु | कमी वेळात जास्त पैसे मिळवणे हे आजकालच्या प्रत्येकाचं स्वप्न आहे. या कारणामुळे अनेक लोक सायबर क्राईमचे शिकार बनले आहेत. सायबर क्राईमची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली असून याबाबतचे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. अशाप्रकारे बंगळुरुमधील एक टॅक्सी चालकही सायबर गुन्ह्याचा शिकार ठरला आहे. हा प्रकार अत्यंत धक्कादायक असून प्रत्येकाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा देखील आहे.

बंगळुरु येथील बेल्लांदुर भागात राहणाऱ्या टॅक्सी ड्रायव्हरने कामसेतू सेक्स गोल्ड औषधांच्या गोळ्या विकत घेतल्या होत्या. या गोळ्या कामभावना वाढवण्यासाठी घेतल्या जातात. संबंधित टॅक्सी ड्रायव्हरचं नाव अमन असं आहे. खरेदी केलेल्या गोळ्यांवर एक मोठ्या रकमेचं बक्षिस देणारं गिफ्ट कार्ड तुम्हाला लागलेलं आहे, असं सांगणारा फोन अमनला आला होता. त्यानंतर सायबर चोरांनी त्याला 2 लाख 17 हजार रुपयांना गंडा घातला आहे.

अमनला गिफ्ट कार्ड बद्दल सांगण्यात आल्यानंतर त्याने त्यावर विश्वास ठेवला. ते गिफ्ट कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला काही रक्कम भरावी लागेल असं सांगून त्या चोरांनी त्याच्याकडून 2.17 लाख रुपये त्याच्याकडून लंपास केले. ही गोष्ट अमनच्या नंतर लक्षात आली. अमनने व्हाइटफिल्ड सीईएन पोलीस ठाण्यात आयटी अॅक्टअंतर्गत तक्रार नोंदवली आहे.

दरम्यान, चोरांना पकडण्यात अद्याप पोलिसांना यश आलेलं नाही. तसेच ऑनलाइन व्यवहार करताना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना सायबर क्राइम विभागातील पोलीस वारंवार देत असतात. गिफ्टच्या मोहापोटी अमनला दोन लाखांहून अधिक रुपयांचा फटका बसला आहे, त्यामुळे तुम्ही अशाप्रकारे अनोळखी व्यक्तीसोबत व्यवहार करताना काळजी घ्या.

थोडक्यात बातम्या-

लॅाकडाऊनमुळं महाराष्ट्रातील ‘या’ खासदाराला मिळाला वेळ, मग काय थेट गहू कापायला घेतला!

इतक्या दिवसांचा असू शकतो महाराष्ट्रातील लॉकडाऊन, दोन दिवसात होणार निर्णय!

“मुख्यमंत्री महोदय, तुमच्या मंत्र्यांना आवरा”; भर बैठकीत देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

नागरिकांनो तयारी ठेवा!; मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनसंदर्भात मांडली ‘ही’ महत्त्वाची भूमिका

मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला राज ठाकरे गैरहजर; अनुपस्थितीचे खरे कारण आले समोर

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More