अहमदनगर | काही लोकांच्या नाकाच्या शेंड्यावर राग असतो, असं आपण म्हणतो. तस पाहायला गेलं तर राग हा मनुष्याचा मोठा शत्रू आहे. रागामध्ये होत्याचं-नव्हतं करण्याची ताकद असते. अशातच याच रागामुळे अहमदनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.
रागाच्या भरात स्वत:वरचं नियंत्रण सुटल्यानं एका तरूणाची चाकूने वार करत हत्या करण्यात आली आहे. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळगाव उज्जैनी या ठिकाणी घडली असून, या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हत्या झालेल्या तरूणाचं नाव शरद वाघ असं असून, तोही पिंपळगाव उज्जैनी या भागात राहत होता.
सोमवारी 24 मे रोजी शरद आणि त्याचे काही मित्रांसोबत पिंपळगावामधील माळरानावर फेरफटका मारण्यासाठी गेले होते. त्याठिकणी शरद आणि त्याच्या मित्रांनी जोरजोरात आरडा-ओरडा करायला सुरूवात केली. त्यांचा हा गोंधळ बराच वेळ सुरू होता. त्यांच्या या कृत्यामुळे त्या परिसरातील काही लोकांबरोबर त्यांचा वाद झाला.
कितीही सांगितलं तरी शदर आणि त्याचे मित्र शांत बसायला तयार नव्हते. त्यानंतर त्या परिसरातील लोकांचा आणि त्यांचा वाद खूप वाढला, याच वादातून काही जणांनी शरदच्या पोटावर चाकूने वार केले. चाकू धारदार असल्यामुळे शरदचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून, हत्या केल्याच्या आरोपाखाली पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाचा आणखी तपास पोलीस करत असल्याचंही समजतंय.
थोडक्यात बातम्या-
खळबळजनक! शौचालयासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेवर गँगरेप, खांबाला लटकवलं अन्…
रत्नागिरीत आढळला पांढरा कावळा, पाहा व्हिडीओ
“पीएम केअर फंडात 2.51 लाख दिले, पण माझ्याच आईला बेड मिळवून देऊ शकलो नाही”
बीएमसीने काढलेल्या ‘या’ ग्लोबल टेंडरला एकूण 8 कंपन्यांचा प्रतिसाद पण…
स्वत: गर्भवती असूनही 9 महिने केली रुग्णांची से
Comments are closed.