बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“यांच्या धमन्यांमध्ये रक्ताऐवजी टोमॅटो सॉस भरलाय म्हणूनच…”

मुंबई | राज्यात सध्या अनेक मुद्दे गाजत असताना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राजकारण तापलेलं पाहायला मिळत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे राणा दांपत्याच्या भेटीला गेले असताना खार पोलीस ठाण्याबाहेर शिवसैनिकांनी त्यांच्यावर हल्ला केला.

या हल्ल्यात सोमय्या जखमी झाल्याने भाजप (BJP) आक्रमक झालेलं पाहायला मिळालं. या मुद्द्यावरून आरोपाच्या फैरी झाडल्या जात असताना शिवसेनेचे (Shivsena) मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून तुफान टोलेबाजी करण्यात आली आहे.

भाजपच्या धमन्यांत सच्चेपणा, हिंदुत्वाचे रक्त नसून टोमॅटो सॉस आहे हे आता बाहेर आलं आहे. याबदल्यात प्रेसिडेंट रूल लावावा, अशी मागणी फडणवीस साहेबांकडून करण्यात आली आहे. रक्ताऐवजी धमन्यांत टोमॅटो सॉस भरला की अशा भन्नाट कल्पना एखाद्या राजकीय पक्षाला सुचू शकतात, असा घणाघात शिवसेनेने केला आहे.

दरम्यान, सोमय्यांच्या गालावरून टोमॅटो सॉस टपकल्याने राज्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडली आहे का?, असा खोचक सवाल देखील शिवसेनेने उपस्थित केला आहे. तर यावर गृहमंत्री वळसे-पाटलांनी याचा तपास करण्यासाठी फडणवीसांच्याच अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमायला हरकत नाही, असा टोलाही शिवसेनेने लगावला आहे.

थोडक्यात बातम्या-

“किरीट सोमय्या भाजपचा नाचा आणि देवेंद्र फडणवीस त्याचे सूत्रधार”

मुंबईतून कोरोनाची धक्कादायक आकडेवारी समोर, टास्क फोर्सने केली महत्त्वाची मागणी

नवनीत राणा आणि अंडरवर्ल्ड कनेक्शन?, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ

लोकल प्रवाशांसाठी मुंबई उच्च न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय, आता लोकलमधून कोणी पडलं तर…

“मोटा भाई कोण छे, हे अमितभाईंनी 2014 मध्येच दाखवून दिलं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More