पुणे | राज्यात आगामी विधानसभा निवडणुका महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्र लढवली तर भाजपला 50 पेक्षा जास्त जागा जिंकता येणार नाहीत, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या जन्मदिनानिमित्त नियोजित कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी जयंत पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर देत असताना ते बोलतं होते.
भाजपला राजस्थान आणि हैदराबादमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळालेले यश आणि भाजपने दिलेला मिशन मुंबईचा नारा या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांना पत्रकारांनी प्रश्न विचारण्यात आला होता.
यावर ते म्हणाले की, “नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची ताकद दिसून आली आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. आगामी काळात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सोबत लढली, तर भाजपचे 50 आमदारदेखील निवडून येणार नाही”.
थोडक्यात बातम्या-
प्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचं निधन
महिलेला पार्टीला बोलवून तिच्यासमोर नग्ननृत्य; पुण्यातील विकृत घटनेनं खळबळ
गव्याच्या मृत्यूवर गिरीश कुलकर्णींची प्रतिक्रिया; म्हणाले…
दहावी बारावीच्या परीक्षा कधी होणार?, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं स्पष्ट
रावसाहेब दानवेंचा डीएनए हिंदुस्थानचा की पाकिस्तानचा, चेक करावा लागेल- बच्चू कडू