बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन’, वानखेडे-मलिक वाद विकोपाला

मुंबई | नवाब मलिक आणि समीर वानखेडे हे नाव गेल्या काही दिवसांपासून चांगलंच चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मलिकांनी समीर वानखेडेंवर फसवणूक करून नोकरी मिळवल्याचे आरोप केले आहेत.

नवाब मलिकांनी सोशल मीडियावरून समीर वानखेडेंचा जन्माचा दाखलाही शेअर केला आहे. हा दाखला जर चुकीचा असेल आणि मी खोटं बोलत असेल तर माझ्यावर दावा दाखल करा, असं थेट आव्हान त्यांनी वानखेडेंना दिलं होतं. त्यानंतर आता मलिकांनी या प्रकरणात चांगलीच उडी घेतली असून ‘मी दिलेली माहीती खोटी आढळल्यास मी मंत्रिपदाचा राजीनामा देईल’, असं म्हटलं आहे.

सध्या या प्रकरणामुळे एनसीबीचे विभागीय संचालक हे अडचणीत सापडले असून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकेचा वर्षाव होत असताना पाहायला मिळत आहे. तसेच आरोपही होत आहेत. पण या प्रकऱणामुळे आता आर्यन खान अटकेत असलेला कार्डेलिया क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणावरून सगळ्यांचं लक्ष विचलित झाल्याचं पाहायला मिळत आहे.

समीर वानखेडेंवर कारवाई करण्याची मागणी सध्या करण्यात येत असून सरकारमधील मंत्र्यांनी या प्रकरणात उडी घेतल्याने त्याचे चांगले वाईट राजकीय पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत.  या प्रकरणात आता आणखी काय खुलासे होणार?, आणि आता नवाब मलिकांचे आरोप खोटे ठरल्यास ते राजीनामा देणार असं त्यांनी म्हटलंय, याबाबत पुढे काय होणार?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

बाप बापच असतो! ग्रामपंचायत निवडणुकीत बाप-लेक भिडले अन्…

”ती’ खोली हेच स्वातंत्र्याचं खरं सत्य’; सेल्युलर जेलला भेट दिल्यानंतर कंगना भारावली

देशासमोर नवं संकट! ‘या’ राज्यात सापडला कोरोनाचा नवा व्हेरियंट

“त्यांना हवं असेल तर ते मला गोळ्या देखील घालू शकतात”

“तुम्ही करा रे कितीही हल्ला, लय मजबूत भिमाचा किल्ला”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More