बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर पुनावालांना सुरक्षा देऊ’; राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती

मुंबई | पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. त्याच अनुषंगाने या कंपनीचे सीईओ आदर पुनावाला यांच्या जिवीताला धोकाही संभवत आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन पुनावाला यांची सुरक्षा वाढवण्याबाबत गृह मंत्रालयाने निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेच्या एका याचिकेवरून न्यायालयाच्या प्रश्नाला राज्य सरकारने उत्तर दिलं आहे.

केंद्र सरकारने आधीच पुनावाला यांना ‘Y’ दर्जाची सुरक्षा पुरविली आहे. तरी पुनावाला यांना येणाऱ्या धमक्यांमुळे त्यांना ‘Z’ दर्जाची सुरक्षा द्यावी, अशी याचिका वकील दत्ता माने यांनी दाखल केली. त्यांच्या या मागणीवर राज्य सरकाला विचारणा करण्यात आली. त्यावर सरकारी वकिलांनी राज्य सरकारची बाजू न्यायालयात मांडली.

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी सुरक्षा देण्यासंदर्भात विनंती केली तर त्यांना देऊ, असं राज्य सरकारने उच्च न्यायालयाला शुक्रवारी सांगितलं आहे. न्या. एस.एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी सुरू होती.

दरम्यान, सरकार त्यांना पुरेशी सुरक्षा पुरवेल. आम्ही अशी याचिका दाखल करून घेऊ शकत नाही. त्यांना सुरक्षा नको असेल तर? इथे त्यांच्या सुरक्षेसाठी याचिका दाखल केली आहे, याची त्यांना माहितीही नसेल, असं म्हणत न्यायालयानं वकील दत्ता माने यांची याचिका निकाली काढली आहे.

थोडक्यात बातम्या-

अबब! केवळ 12 दिवसात तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी महागलं इंधन; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

पुणे विद्यापीठात फिरायला यायचं असेल तर यापुढे पैसे द्यावे लागणार!

“प्रकाश आंबेडकरांशी आघाडी करण्यासाठी लवकरच चर्चा करणार”

“शरद पवार देशाचे पंतप्रधान झाल्यास आम्हाला आनंदच होईल”

“प्रकाश आंबेडकरांना नको तिथे नाक खुपसून प्रसिद्धीत राहण्याची घाण सवय”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More