महाराष्ट्र मुंबई

‘…तर महाराष्ट्राचंही नामांतर करा’; या नेत्याची राज्य सरकारकडे मागणी

मुंबई | औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. या नामांतराच्या मुद्द्यावरून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीमधील शिवसेना आणि काँग्रेस आमने-सामने आले आहेत.

महाविकास आघाडीला बाहेरून पाठिंबा असलेल्या समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी औरंगाबादच्या नामांतराला विरोध करताना नाव बदलायचंच असेल तर महाराष्ट्राचं नामांतर करा आणि छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्र असं नाव द्या, अशी मागणी अबू आझमी यांनी केली आहे.

शहरांची जिल्ह्यांची नावे बदलून काही फायदा नाही. नामांतर करून विकास होत नाही. नामांतर करायचं असेल तर नवे जिल्हे निर्माण करा. त्यांना नाव द्या, असं अबू आझमी म्हणालेत.

औरंगाबाद, अहमदनगर यांची नावं बदलून उपयोग नाही. संभाजी महाराजांचे नाव द्यायचं असेल तर ते रायगड जिल्ह्याला द्या, त्यापेक्षा महाराष्ट्राचं नामांतर करा आणि छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्र असं नाव द्या, असा सल्ला अबू आझमी यांनी दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सौरव गांगुलीला फोन, म्हणाले

शिवबंधन सोडत ‘या’ शिवसेना नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश!

शिवसैनिकांनो…सध्या मोर्चाची गरज नाही- संजय राऊत

शिवसेनेचा भगवा हिरवा झाला आहे का?- किरीट सोमय्या

पत्नीसाठी अनिल देशमुख यांनी येरवडा कारागृहातून खरेदी केली पैठणी!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या