बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर Omicron मुळे देशात तिसरी लाट येईल’, IMAचा इशारा

नवी दिल्ली | ओमिक्राॅन (Omicron) व्हेरिएंटनं आता हळूहळू हात पाय पसरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे लसीकरण होऊनही ओमिक्राॅनची लागण होत असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

ओमिक्राॅनच्या (Omicron) संसर्गाची सुरुवात दक्षिण अफ्रिकेमधून झाली होती. मात्र आता भारतामध्ये देखील या विषाणूनं थैमान घालायला सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेमध्येही डेल्टामुळेच तिसरी लाट आली होती. नवा ओमिक्रॉन व्हेरियंट डेल्टा व्हेरियंटची जागा घेत असल्याचे संशोधकांच्या निदर्शनास येत आहे.

ओमिक्राॅनच्या वाढता संसर्ग पाहता भयंकर तिसरी लाट येऊ शकते, असा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA)ने दिला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितलं जात आहे.

लवकरात लवकर कठोर पावलं उचलली नाही तर तिसरी लाट येईल, असं इंडियन मेडिकल असोसिएशन म्हटलं आहे. भारतात ओमिक्राॅनची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन कर्मचारी आणि कमकुवत रोगप्रतिकारक्षमता असलेल्या व्यक्तींना लसीचा बूस्टर डोस देण्यात यावा, अशी विनंती आयएमएचे अध्यक्ष डॉ. जे. ए. जयलाल आणि सरचिटणीस जयेश एम. लेले यांनी केंद्र सरकारला केली आहे.

थोडक्यात बातम्या – 

दिलासादायक! Omicron वर औषध सापडलं, शास्त्रज्ञांचा दावा

डेल्टापेक्षा omicron किती घातक?; ‘ही’ दिलासादायक माहिती आली समोर

“संजय राऊत एक नंबरचे डबल ढोलकी, खुर्ची टिकवण्यासाठी…”

महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक, ‘इतक्या’ हजार कोटी जणांना मिळणार नोकऱ्या!

Royal Enfield च्या नव्या बाईकचा जलवा; 2 मिनिटांत विकल्या गेल्या सर्व बाईक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More