बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर केंद्र सरकार विकावं लागेल’; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं इंधन दरवाढीचं कारण

मुंबई | देशातील वाढत चाललेल्या महागाईवरून भाजपवर जोरदार टीका होत आहे. पेट्रोल आणि डिझेल आपल्या सर्वकालिन सर्वोच्च किंमतीवर आहे. महागाईवरून केंद्र सरकारवर टीका होत असताना अनेक नेत्यांनी आपल्या अजब वक्तव्यांनी वाद निर्माण केला आहे. आताही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वाढत्या दरांबाबत अजब वक्तव्य केलं आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अगोदरही पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केलं होतं. आता दरवाढीवरून केंद्र सरकारची पाठराखण करताना पाटील म्हणाले की, इंधन दर 50 पैसे जरी कमी केलं तरं केंद्र सरकार विकावं लागेल. पाटील यांच्या या वक्तव्याची राज्यात जोरदार चर्चा होत आहे.

पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर राज्य सरकारमुळं दरवाढ झाली असं म्हटलं आहे. अजित पवार यांनी पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यास विरोध का केला? असा सवाल पाटील यांनी यावेळी उपस्थित केला आहे. 100 रूपये पेट्रोल आणि डिझेलचा दर आहे तर त्यातील 30-35 रूपये परचेस काॅस्ट आहे. आपण कितीतरी लाख लीटर पेट्रोल आणि डिझेल घेतो 50 पैसे जरी कमी केला भाव तरी केंद्र सरकार विकावं लागेल, असं स्पष्टीकरणासह पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेल या इंधनांच्या दरवाढीवरून राज्य सरकार आणि केंद्र सरकार एकमेकांवर टीका करत आहेत. सामान्य माणसांच्या खिशाला मोठ्या प्रमाणात झळ सोसावी लागत आहे.

पाहा व्हिडीओ-


थोडक्यात बातम्या 

सर्वसामान्यांचं स्वप्न महागलं! कोळसा टंचाईमुळे वाढले बांधकाम साहित्याचे दर

“राणेंच्या पोकळ धमक्यांना घाबरत नाही, वेळ आली की कुंडली बाहेर काढू”

पेट्रोल-डिझेलचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी मोदी सरकारचा मास्टरप्लॅन, वाचा सविस्तर

अफगाणिस्तानात खळबळ! ‘या’ स्टार खेळाडूची तालिबान्यांकडून हत्या

विराटनंतर टीम इंडियाचा कर्णधार कोण? ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सराव सामन्यात मिळाले संकेत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More