बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘….तर अशांना महाराष्ट्र सरकार खपवून घेणार नाही’; सुप्रिया सुळे आक्रमक

नवी दिल्ली | सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर ड्रग्स प्रकरण (Drugs Case) चांगलंच प्रकाशझोतात आलं. त्यानंतर एनसीबीनं अनेक मोठमोठे छापे टाकले. यावरुन राजकीय वर्तुळातही खळबळ पहायला मिळाली. अशातच सोमवारी लोकसभेत राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी ड्रग्सच्या मुद्द्यावरुन एनसीबीवर (NCB) हल्लाबोल केला आहे.

ड्रग्जविरोधात लढा द्यायचा असेल तर तरुण मुलामुलींवर कारवाई करण्यापेक्षा मोठ्या आरोपींवर कारवाईची गरज असल्याचं सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी म्हटलं. काही अधिकाऱ्यांकडून पदाचा दुरुपयोग होतोय, एखाद्यावर खोटे आरोप लावून पैसे उकळण्याचे काम होतेय, हा कोणत्या प्रकारचा न्याय आहे, असा प्रश्नच सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत उपस्थित केला.

एनसीबी कारवाईत जर अधिकारी आपल्या पदाचा गैरवापर करत असेल तर अशांना आमचे राज्यातील सरकार खपवून घेणार नाही, असं सुळेंनी लोकसभेत ठणकावूनच सांगितलं.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य हे देशात गुटखाबंदी करणारे राज्य आहे. आम्ही जर तंबाखू, गुटख्याविरोधी लढतो आहोत तर ड्रग्स संपवण्यासाठी आम्ही आपल्यासोबत का लढणार नाही, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

थोडक्यात बातम्या – 

बेशिस्त वाहनचालकांना प्रशासनाचा चपराक; आता नियम मोडले तर..

मनी लाॅन्ड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचा मोठा खुलासा, म्हणाली…

धक्कादायक! ‘या’ ठिकाणी Omicron मुळे पहिला बळी

राहुल गांधींची मुंबई सभा होणार?; उच्च न्यायालयात याचिका दाखल

“त्यांच्या बापाशी लढून मी पक्षाबाहेर पडलोय, नाना पटोले कुणाच्या…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More