बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थांबवता येईल – मोदी सरकार

नवी दिल्ली | देशातील कोरोना संसर्ग कमी होताना दिसत असला तरीही अद्याप कोरोनाचा धोका टळलेला नाही. अनेक राज्यांमध्ये अनलॉक प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. तर, देशभरात लसीकरण मोहीम देखील सुरू आहे. अशातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्याचा मार्ग मोदी सरकारनं दिला आहे.

कोरोनाच्या नियमांचं पालन करणं आणि कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करणं आवश्यक आहे. या दोन मार्गांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थांबवता येईल, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे.

जास्तीत जास्त कोरोना लसीकरण आणि कोरोना नियमांचं योग्य पालन केल्यास कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखता येईल. असे अनेक देश आहेत, जिथं कोरोनाची दुसरी लाट आली नाही. जर आपण कोरोनासंबंधी नियमांचं नीट पालन केलं तर हा वेळही निघून जाईल, असं नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितलं.

दरम्यान, कोरोना लॉकडाऊनचे नियम शिथिल करताच नागरिकांनी  गर्दी करायला सुरू केली आहे. याचा मोठा फटका देशाला बसू शकतो. देशात पुढील 6 ते 8 आठवड्यात कोरोना विषाणूची तिसरी लाट येणार असल्याचा इशारा एम्स रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे.

थोडक्यात बातम्या – 

काॅंग्रेसला बाजूला ठेवत राष्ट्रवादी तिसरा फ्रंट काढणार? पवारांच्या बैठकीमुळे चर्चांना उधाण

“भाजपच्या ‘या’ नेत्याने फडणवीसांनी तिकीट कापून वेशीवर का टांगलं याचं चिंतन करावं”

कौतुकास्पद! मुलीला पाठीवर घेऊन नदी ओलांडणाऱ्या महिला नर्सचा फोटो व्हायरल

वाह शमी वाह! मोहम्मद शमीने वॉटलिंगच्या उडवल्या दांड्या; पाहा व्हिडीओ

धक्कादायक! मुंबईत बेशुद्ध अवस्थेत असलेल्या रूग्णाचे डोळे उंदराने कुरतडले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More