बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर जगाला गंभीर परिणाम भोगावे लागतील’; तालिबानची थेट अमेरिकेला धमकी

मुंबई | अमेरिकेने कराराप्रमाणे आपलं सैन्य मागे घेतल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला. त्यानंतर तालिबान्यांनी अफगाणिस्तानमध्ये आपली सत्ता स्थापन केली. आता तालिबान सत्तेत असलं तरी आर्थिक कचाट्यात सापडलेलं दिसतंय. गेल्या काही महिन्यांपासून अफगाणिस्तानमधील नागरिक भूकमारीचे शिकार होताना दिसत आहे. अशातच आता तालिबानने थेट अमेरिकेला धमकी दिली आहे.

तालिबानने सत्ता स्थापन केल्यानंतर संपूर्ण जगाने तालिबानच्या सरकारला मान्यता द्यावी, अशी मागणी तालिबान्यांनी केली होती. मात्र, अमेरिका आणि भारतासह इतर अनेक देशांनी या मागणीला नापंसती दर्शवली होती. त्यामुळे आता तालिबानी सरकार अस्वस्थ झालेलं दिसून येतंय. त्यामुळे तालिबानी सरकारला अमेरिका आणि इतर देशांनी मान्यता द्यावी, नाहीतर जगाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी तालिबानने दिली आहे.

तालिबानने सत्ता स्थापन केल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर अफगाणिस्तानचे पैसे गोठवण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला होता. आता अमेरिकेने हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा अफगाणिस्तानला गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल, असा इशारा देखील तालिबान्यांनी यावेळी दिला आहे.

दरम्यान, अमेरिकेने जर तालिबान सरकारला नाकारलं तर युद्धाची स्थिती तयार होऊ शकते. त्यामुळे दोघांनी मिळून शांततेत मार्ग काढावा, असं तालिबानचा प्रवक्ता जाबीहुल्ला मुजाहीद यांने म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“मी अधिवेशनात पोलखोल करणार, भाजपचे नेते तोंड लपवून पळतील”

राज्यात हुडहुडी वाढली! स्वेटर, कानटोप्या, जॅकेट बाहेर काढा

व्हायोलिनचा ‘स्वराधीन’ हरपला! ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग यांचे निधन

“छत्रपतींचा जयजयकार करायला लाज वाटते तो भंगारवाला आमच्यासाठी भंगारच”

न्यूझीलंडला नमवण्यासाठी विराटसेना सज्ज! दोन्ही संघासाठी ‘करो या मरो’ची लढाई

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More