बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“लस आहे पण देण्याची ऑर्डर नाही, कोरोनाकाळातील अपयश झाकण्यासाठी ठाकरे सरकारने….”

मुंबई | एकीकडे राज्यातील कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत सतत मोठी भर पडत आहे. तर दुसरीकडे राज्यात कोरोनावरील लसींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील अनेक लसीकरण केंद्रावरील लसीकरण बंद करावे लागले आहे. कोरोनाच्या लसींच्या कमी पुरवठ्यावरून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती.

याचदरम्यान, भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी कोरोनाच्या लसीवरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रामध्ये लसी आहे, पण लसी देण्याची ऑर्डर नाही आहे. ठाकरे सरकारने आता कोरोना काळातील प्रचंड अपयश झाकण्यासाठी नागरिकांना वेठीस धरण्यास सुरुवात केली आहे, किती हा बेशरमपणा? असा टोला त्यांनी ट्विटद्वारे लगावला आहे.

गेल्या काही दिवसांत राज्यात कोरोनाचे 50 हजारहून अधिक रुग्ण सापडत आहेत. गुरुवारी महाराष्ट्रामध्ये 56 हजार 286 रुग्णांची नोंद झाली होती. तर दिवसभरात 376 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे राज्यात कोरोनाचे लसीकरण वाढवण्याची मागणी होत आहे. तसेच त्यासाठी राज्याला दर आठवड्याला किमान 40 लाख डोस मिळाले पाहिजेत, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल केली होती.

दरम्यान, राज्यात कालपासून अनेक भागात कोरोना लसीचा तुटवडा भासतोय. सातारा, सांगली, कोल्हापूर, पनवेलमध्ये लसीअभावी कोरोना लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची नामुष्की ओढावली आहे. तर पुण्यातही काही लसीकरण केंद्रावर लसीचा साठा संपल्यामुळे अनेक नागरिकांना लस न घेताच परतावं लागल्याचं कळतंय.

थोडक्यात बातम्या – 

“लस उत्सव साजरा करण्यासाठी आधी लस तरी उपलब्ध करून द्या” – जयंत पाटील

मध्य रेल्वेचा प्लॅटफाॅर्मवरील गर्दी टाळण्यासाठी ‘हा’ महत्वपुर्ण निर्णय

‘ज्याला दोनवेळा आमच्या दत्तामामानं पाडलं तो आता…’; अजित पवारांचा हर्षवर्धन पाटलांना टोला

“केंद्रावर आरोप करा आणि आपलं पाप झाका, ठाकरे सरकार सध्या एवढंच करतंय”

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांचा भाजपला आणखी एक धक्का!

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More