बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पदोन्नती आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये विसंवाद नाही- जयंत पाटील

नांदेड | मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षण आणि पदोन्नती आरक्षण या तिन्ही प्रश्नावर सरकार अडचणीत आल्याचं दिसत आहे. ओबीसी राजकीय आरक्षणावरून भाजपने आक्रमक भूमिका घेत चक्का जाम आंदोलन केलं होतं. तर पदोन्नतीच्या आरक्षणावर काँग्रेसने आधीपासून पांठिबा दर्शवत ठाकरे सरकारला अडचणीत आणलं आहे. त्यावर आता जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

पदोन्नतीमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही विसंवाद नाही. विरोधी पक्षाने तशाप्रकारचं वातावरण निर्माण केलं आहे, असं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिसंवाद यात्रेदरम्यान त्यावेळी त्यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे.

काँग्रेस नेहमीच मागासवर्गियांच्या सोबत राहिली आहे, मात्र मागासवर्गीयांसोबत जे सध्या चालू आहे, ते आम्ही काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या कानावर घालू, असं राऊत म्हणाले होते. मंत्रीमंडळातून बाहेर पडायचे की नाही हा निर्णय घेण्याचा अधिकार काँग्रेस पक्षाच्या हायकमांडचा आहे. मात्र काँग्रेस पक्षाला गृहित धरू नका, आम्ही तुमचे नोकरदार नाहीत, असा इशारा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ठाकरे सरकारला दिला होता. त्यानंतर या वादाला सुरवात झाली होती.

दरम्यान, ठाकरे सरकारमध्ये काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील वाद वाढत चालल्याचं चित्र आहे. हा वाद मिटवण्याचं काम राष्ट्रवादी करताना दिसत आहे. तर दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी तिन्ही पक्ष भाजपवर टीका करत आहेत. त्यामुळे अंतर्गत वाद असला तरी भाजपवर दुरच ठेवायचं असा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारमध्ये होताना दिसत आहे.

थोडक्यात बातम्या-

“फडणवीस आणि फसवणूक हे समानार्थी शब्द आहेत”

आनंदाची बातमी! मुंबईतील कोरोना आटोक्यात; सक्रिय रूग्णांसह नव्या बाधितांच्या संख्येत घट

‘तुझ्या दिसण्यामुळं तुझं अभिनेत्री होणं कठीण’, ‘या’ अभिनेत्रीनं मुलीला दिला होता सल्ला

“वाघ आमच्याच इशाऱ्याने चालतो”; भरसभेत वडेट्टीवारांचा शिवसेनेवर घणाघात

“…तर प्रीतम मुंडे खऱ्या अर्थाने स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवतायत हे सिद्ध होईल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More