मोठी बातमी! राष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांना उद्धव ठाकरेंचा पाठिंबा
मुंबई | राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीत भाजपकडून आदिवासी नेत्या द्रौपदी मूर्म या उभारल्या आहेत. त्यांच्या पाठिंब्यासंबधी मातोश्रीवर खासदारांची बैठक घेण्यात आली होती. पक्षप्रमुखाचा निर्णय अंतिम राहिल आणि तो आदेश सर्व सर्व खासदार आणि आमदारांसाठी बंधनकारक असेल, असं सांगण्यात आलं होतं. काही खासदारांनी राष्ट्रपती निवडणुकीत द्रौपदी मूर्म(Draupadi Murm) यांनाच पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली होती.
आज अखेर याबद्दल शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. शिवसेना राष्ट्रपती निवडणुकीत द्रौपदी मूर्म(Draupadi Murm) यांनाच पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं. यासंबधी माझ्यावर कोणताही दबाव टाकण्यात आला नाही. खासदारांनी शेवटचा निर्णय माझ्यावर सोपवला होता. त्यामुळे मी कोणाचाही दबावात न येता माझा निर्णय दिला आहे, असं स्पष्टीकरण दिलं.
यासाठी आदिवासी नेते अमिशा पाडवी,शिवाजीराव भवरे, गावित हे सगळे लोक मला येऊन भेटले. आमच्या समाजाला एक ओळख भेटत आहे तर तुम्ही संधी द्यावी, पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा आहे. यामुळे आम्हाला आनंद होईल, अशी मागणी केली होती. त्यांच्या शब्दाला मान देत आम्ही हा निर्णय दिला आहे.
सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आम्ही विरोध करायला हवा. मात्र शिवसेना कोत्या मनाची नाही. या आधी प्रतिभा पाटील यांना आणि त्यानंतर प्रणव मुखर्जी या यूपीएच्या उमेदवारांना शिवसेनेनं एनडीएपेक्षा वेगळा निर्णय घेतला होता, असंही ते म्हणाले.
थोडक्यात बातम्या
कॉमेडियन वीर दासने पुन्हा उडवली भारताची खिल्ली, म्हणाला…
धक्कादायक! गुजरातमधून 350 कोटींचं हेराॅइन जप्त
‘या’ कारणामुळे मुख्याध्यापकाचा पगारच कापला, कारण ऐकून नेटकरी संतापले
मुर्मू की सिन्हा? शिवसेना कोणाला पाठींबा देणार?, वाचा सविस्तर
‘…तर सलमान खानला जीवानिशी मारु’, लॉरेन्स बिश्र्नोईने आणखी एकदा दिली धमकी
Comments are closed.