बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काही गैरसमज झाले पण यापुढे असं होणार नाही- अजित पवार

पुणे | मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना निमंत्रण न दिल्यावरुन वाद झाला होता. आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. पुण्याचे प्रथम नागरिक म्हणून महापौरांचा मान असतो. मी स्वतः पुण्याचा नागरिक आहे. त्यामुळे यापुढे असं होणार नाही, असं आश्वासन अजित पवार यांनी यावर दिलंय.

मुंबईतील बैठकीला मी स्वतः महापौरांना बोलवलं होतं. मात्र बातम्या वेगळ्या आल्यात. आज त्यासंदर्भात माझी महापौर आणि माझी चर्चा झाली. प्रथम नागरिक या नात्याने महापौरांचा मान असतो. त्यासंदर्भात काही गैरसमज झाले, असं अजित पवारांनी सांगितलं. ते शुक्रवारी पुण्यात झालेल्या कोरोना आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

मागच्या बैठकीला ऑफिसच्या कामामुळे मला येता आलं नाही. दुर्दैव असं की एखादी बैठक टाळली तर लगेच चर्चा वेगळी होते. आंबिल ओढ्याच्या तोडकामासंदर्भात जी चर्चा झाली, त्याबाबत माझा काही संबध नाही. यामध्ये बऱ्याचदा राजकारण आणलं जातंय, असं अजित पवार म्हणाले.

राज्य सरकार नवीन 500 रुग्णवाहिका घेणार आहे. पुण्याचा पोझिटिव्हीटी रेट गेल्या आठवड्यात 4.6 टक्के होता आणि 5.3 टक्के झाला आहे. जी नियमावली होती तीच नियमावली कायम ठेवण्याचा निर्णय झालाय, अशी माहिती अजित पवारांनी दिली.

थोडक्यात बातम्या- 

केंद्र सरकारविरोधात बाॅलिवूडचे कलाकार एकवटले, नव्या सिनेमॅटोग्राफ विधेयकाला जोरदार विरोध

“सरकार स्थापन झाल्यापासून तिघांच्या खिशात खंजीर, कधी कधी एकमेकांना खुपसतील सांगता येत नाही”

जो समाज मागासलेलाच नाही त्यांना आरक्षण मिळूच शकत नाही- गुणरत्न सदावर्ते

“ईडी म्हटलं की लोक घाबरतात, तुमचा भुजबळ करू असं सांगितलं जातं”

सॅल्यूट! कोरोनानं पालक गमावलेल्या 100 मुलांची जबाबदारी ‘या’ तरुणानं घेतली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More