बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जोपर्यंत कोरोना कमी होणार नाही तोपर्यंत साहित्य संमेलन नाही”

औरंगाबाद | अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन लांबत चाललं आहे. मागील वर्षीही नाशिकमध्ये आयोजित केलेलं 94 मराठी साहित्य संमेलन कोरोनामुळे स्थगित करण्यात आलं होतं. त्यामुळे यंदाचं साहित्य संमेलन पार पडणार की नाही यावर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबाबत मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी माहिती दिली आहे.

संमेलन व्हायला पाहिजे अशी लोकांची इच्छा आहे. लोकांचा मान राखून साहित्य संमेलन झाले पाहिजे. परंतू जोपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नाही आणि सरकार परवानगी देत नाही तोपर्यंत संमेलन आयोजित करता येणार नाही, असं कौतिकराव ठाले पाटील यांनी म्हटलं आहे.

सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सगळीकडे ऑनलाईन पद्धतीचा उपयोग करताना नागरिक दिसत आहेत. त्यामुळे साहित्य संमेलनाबाबत तसा काही निर्णय घेणार का?, असा प्रश्न ठाले पाटील यांना करण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले की, ऑनलाईन संमेलन हे संकल्पनेत बसत नाही. लोकांना पुस्तक खरेदी करावे लागतात त्यामुळे साहित्य संमेलन ऑनलाईन आयोजित केलं जाणार नसल्याचं ठाले पाटलांनी सांगितलं.

दरम्यान, कोरोनाचे सर्व नियम पाळत कोरोना लसीची दोन डोस घेतलेल्यांना प्रवेश देण्याचा विचार चालू असल्याचंही साहित्य मंडळाकडून सांगण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! पूरग्रस्तांसाठी 11 हजार 500 कोटींच्या पॅकेजला मंजुरी

… अन्यथा आंदोलन करण्यात येईल, एमपीएससीचे विद्यार्थी पुन्हा आक्रमक!

माझ्या व्यवसायावर लाथ मारू नकोस- गुलशन ग्रोवर

भररस्त्यात तरुणीचा हायहोल्टेज ड्रामा! गाडी चालकाच्या कानाखाली लगावत…; पाहा व्हिडीओ

“भगतसिंह कोश्यारींना समजायला हवं ते मुख्यमंत्री नसून राज्यपाल आहेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More