मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोप उधाण आलं आहे. त्यातच आता राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी भाजवर हल्लाबोल केलाय. एखाद्या महिलेचा मृत्यू झाल्यावरही काही मंडळी तिला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. घाणेरडे राजकारण भाजपच्या लोकांकडून सुरू आहे, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
कोणत्या अभिनेत्रीचा कोणासोबत संबंध आहे हे उघड करायला लावू नका. भाजपच्या नेत्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे. दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियन हिचा बलात्कार करून हत्या करण्यात आली, असा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला होता. त्यावरून नवाब मलिक यांनी इशारा दिला आहे.
काही बातम्या येत आहेत की, आगामी राष्ट्रपती निवडणुकीसाठी नितिश कुमार यांचं नाव चर्चेत आहे. जोपर्यंत ते भाजप सोडत नाहीत तोवर चर्चा नाही, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. भाजपची सत्ता पाच राज्यातही येणार नाही. धर्माचे राजकारण 1993 पासून भाजपने सुरू केलं. तेव्हा जनतेने भाजपला बाहेर काढलं होतं, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.
दरम्यान, या पाच वर्षांमध्ये धर्मावर राजकारण करण्यात आलं आहे. युपीमध्ये भाजपचे 150 पेक्षा कमी जागा येतील, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. तसेच राष्ट्रपती निवडणूक सोपी नाही. यावर सगळे राजकीय पक्ष भेटतील. अजून कोणत्याही नावावर चर्चा नाही. नितिश कुमार यांची जर राष्ट्रपती होण्याची इच्छा असेल तर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी द्यावी, असं मलिकांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“शिवसेना-भाजपच्या मैत्रीसाठी संजय राऊतांना भेटणार, महाराष्ट्राच्या भल्यासाठी…”
दिशाच्या आई-वडिलांनी मौन सोडलं, दिशाच्या मृत्यूचं खरं कारण आलं समोर
महाराष्ट्र मास्कफ्री होणार?, उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
“दिशा सालियन प्रकरणाचा लवकरच उलगडा होणार, सर्व पुरावे तयार”
दारू पिण्याचं वय केलं कमी, राज्य सरकारचा मोठा निर्णय
Comments are closed.