देश

सरकारी नोकरींसाठी आता देशभरात एकच सामायिक परीक्षा होणार!

नवी दिल्ली | सरकारी नोकरीसाठी परीक्षा देणाऱ्या इच्छुक उमेदवारांचा ताण कमी व्हावा म्हणून स्थापन करण्यात येणार आहे. त्याद्वारे एकच CET घेण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कॅबिनेट बैठकीत झालेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती दिली.

सरकारी संस्थेत नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व इच्छुक उमेदवारांसाठी सामायिक परीक्षा असेल. त्यासाठी राष्ट्रीय भरती संस्था राष्ट्रीय भरती एजन्सी स्थापन करण्यात येणार आहे.

युवकांना जागोजागी परीक्षा द्यायला जावं लागू नये म्हणून एकच सामान्य पात्रता परीक्षा असेल. यात गुणवत्ता सिद्ध करून उमेदवारांना पुढे जाण्याची संधी मिळू शकेल, प्रकाश जावडेकर यांनी म्हटलंय.

दरम्यान, या संस्थेत एकदा नोंदणी केली की, एकच परीक्षा देऊन आपली योग्यता युवकांना सिद्ध करावी लागेल. त्यामुळे नोकरीसाठी दारोदारी परीक्षा देत भटकण्याची वेळ युवा पिढीवर येणार नाही.

महत्वाच्या बातम्या-

प्रसिद्ध आर्टीस्ट राम इंद्रनील कामतचा बाथटबमध्ये सापडला मृतदेह

काँग्रेस नेते नितीन राऊत यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी घेतलं ताब्यात!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माजी पंतप्रधान राजीव गांधींना वाहिली आदरांजली

देशातील सर्वात स्वच्छ शहरांमध्ये ‘या’ शहराची बाजी; मुंबई-पुण्याचा नंबर कितवा?

मोबाईल बनवणारी ‘ही’ मोठी कंपनी सर्व व्यवसाय भारतात स्थलांतर करण्याच्या तयारीत!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या