बावधान | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंतची ‘भिजत घोंगडी’ बाहेर काढून नागरिकांच्या हिताचेच निर्णय घेतले, त्यामुळेच ते जनतेच्या मनातील मुख्यमंत्री ठरले आहेत, असं वक्तव्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केलं आहे.
शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळावा आणि ग्राहकांना ताजी भाजी मिळावी, या उद्देशाने शिवसेना राज्य जनरल कामगार सेनेचे जिल्हा अध्यक्ष सचिन दगडे आणि मच्छिंद्र दगडे यांच्या वतीने बावधन परिसरात शेतकरी ते ग्राहक आठवडे बाजार सुरू करण्यात आला. त्याचं उद्घाटन डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख सत्यवान उभे, पुणे शहर प्रमुख संजय मोरे, उपजिल्हा प्रमुख बबनराव दगडे, अविनाश बलकवडे, पोलीस पाटील बबनराव दगडे, राहुल दुधाळे, राजेंद्र भुंडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खडकवासला युवा अध्यक्ष कुणाल वेडेपाटील,आदि प्रमुख पादाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, बावधन बुद्रुक गाव पालिकेत समाविष्ट प्रक्रिया करून, त्याचा आराखडा तयार करण्याआधी गावातील नागरिकांना विश्वासात घ्यावे. त्यासाठी मुख्यमंत्री यांच्याबरोबर बैठक घेऊन येथील प्रश्न सोडवावे, अशी मागणी दगडे यांनी त्यावेळी केली.
थोडक्यात बातम्या-
ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर! कोरेगाव तालुक्यात राष्ट्रवादीला धक्का
“धनंजय मुंडेंविरोधात बोलशील तर तुझ्या डोक्यात सहा गोळ्या घालेल”
तांडव वेब सीरिजच्या विरोधात लखनौमध्ये FIR दाखल
भास्करराव पेरे पाटलांना मोठा धक्का; पाटोदा ग्रामपंचायतीत सर्वात धक्कादायक निकाल
30 वर्षानंतर निवडणूक; पोपटराव पवारांच्या हिवरे बाजारमध्ये असा लागला निकाल!