बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

15 वर्षाच्या लेकीने सख्ख्या आईची गळा चिरून केली हत्या; कारण ऐकून सुन्न व्हाल

उल्हासनगर | उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर 4 च्या 26 सेक्शन परिसरात एका 40 वर्षाच्या महिलेचा खून झाल्याची घटना 20 मार्चला समोर आली होती. या हत्येप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. तपासातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हत्या झालेल्या महिलेच्या अल्पवयीन मुलीनेच प्रियकराच्या मदतीने आपल्या आईची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नंतर समोर आला आहे. आरोपी मुलीचं वय 15 वर्ष आहे. या मुलीचे एका मुलासोबत प्रेमसंबंध होते. हे प्रेमसंबंध त्या मुलीच्या आईला मान्य नसल्याने ती या नात्याला विरोध करत होती. या रागातून मुलीने आईची हत्या केल्याची माहिती आहे.

मुलीने प्रियकर दिलजीत यादवच्या मदतीने आईला संपवण्याचा निर्णय घेतला. आई घरी एकटीच असल्याने त्याने प्लॅनिंग केली होती. आरोपी प्रियकराने ठरल्याप्रमाणे दिलजित याने महिलेची राहत्या घरात हत्या केली आणि तो पसार झाला.

दरम्यान, या संपुर्ण हत्त्या प्रकरणाच्या प्लॅनिंगमध्ये मुलीचा देखील सहभाग असल्याचं समोर येताच पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतलं आणि तिला भिवंडी येथील बालसुधा गृहात रवाना करण्यातं आलं. तसेच आणखी 3 आरोपींनाही पोलिसांनी अटक केली असून त्यांना 27 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनवण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

मुलगी दिली नाही म्हणून त्याने मुलीच्या आईलाच फूस लावून पळवलं, अन्…

जास्त मद्यपान केल्यामुळे मृत्यू झाल्यास विम्याची रक्कम मिळणार का?, सर्वोच्च न्यायालय म्हणालं…

मी शिवसैनिक आहे, आम्ही महिलांना धमकावण्याचं काम करत नाही- अरविंद सावंत

“ए भाई , तू जो कोण असशील…”; भाई जगताप यांच्यावर अमृता फडणवीस भडकल्या

“व्वा रे बहाद्दर…महाराष्ट्र नावावर करून घेतलात की काय?”

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More