बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ जिल्ह्यांनी देशाची चिंता वाढवली; कोरोना रुग्णांची धक्कादायक आकडेवारी समोर

मुंबई | कोरोना (Corona) महामारीनं जगभरात थैमान घातलं आहे. त्यामुळे कोरोना महामारीला आटोक्यात आणण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. कोरोनाची दुसरी लाट (Second Wave) आटोक्यात आली असली तरी अद्याप कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे.

लाॅकडाऊननंतर सगळं सुरु होऊन हळूहळू कोरोना नियमांमध्येही शिथिलता केली. त्यामुळे नागरिकांनी पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणी गर्दी करायला सुरुवात केली. त्यामुळे आटोक्यात आलेली रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली. अशातच आता देशातील 10 राज्यांतील 32 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग अजूनही पाच टक्क्यांहून जास्त दिसून येत आहे.

कोरोनाला गंभीर घेत त्याविषयी सतर्कता बाळगण्याची गरज आहे. देशात मिझोराममधील सेरछिप जिल्ह्यात सर्वाधिक नमुने संक्रमित होत असल्याचं लक्षात आलं आहे. गेल्या एका आठवड्यात याठिकाणी 26 टक्क्यांहून अधिक संसर्गाची नोंद झाली. तर अरुणाचल प्रदेशातील सियांग जिल्ह्यात दररोज 17 ते 18 टक्के नमुने संक्रमित होत आहेत.

दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली असली तरी कोरोना व्हायरसमुळे संपुर्ण जगाला मोठा फटका बसला आहे. या व्हायरसनं लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. अजुनही भारतात कोरोनाची दुसरी लाट असल्यानं परिस्थिती गंभीर आहे.

थोडक्यात बातम्या – 

“एकेरी उल्लेख करता, तुमचं कर्तृत्व काय?”, संजय राऊतांनी घेतला पडळकरांचा समाचार

आझाद मैदानातील आंदोलनातून भाजपचा काढता पाय; सदाभाऊ म्हणाले…

“शशिकांत शिंदेंना ठरवूनच पाडलं, शिंदेंचा विजय झाला असता तर…”

“आता महिलांनी घरकोंबड्या सरकारसारखं घरातच बसायचं का?”

’26/11 हल्ल्यावेळी परमबीर सिंहांनी कसाबला मदत केली’, निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या आरोपाने खळबळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More