बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Omicron विरोधात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ‘हे’ पदार्थ ठरतील परिणामकारक

नवी दिल्ली | सध्या कोरोना विषाणूने (Corona Virus) पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. त्यातचं ओमिक्रॉनच्या (Omicron) रुग्णांचीही संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे आता ओमिक्रॉन विरोधात रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढविण्यासाठी तज्ज्ञांनी काही उपाय सुचवले आहेत. काही घरगुती पदार्थ खाऊनही तुम्हाला रोगप्रतिकार वाढविता येऊ शकते.

थंडीत रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी तूप फार जास्त परिणामकारक ठरतं. तूप आपल्या इम्युन सिस्टीमला बुस्ट करण्याचं काम करते. त्याचबरोबर गुळदेखील रोगप्रतिकार वाढविण्यासाठी फायद्याचा आहे. आयुष मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गुळाचा काढा रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी फायदेशीर ठरतो.

बाजरी थंडीमध्ये नेहमीचं शरीरासाठी उपयुक्त ठरते. न्युट्रीयंट्स, विटॅमिन, मिनरल आणि फायबर्स असल्याने बाजरी ओमिक्रॉनविरोधात परिणामकारी ठरतेे. त्याचबरोबर आले (Ginger) देखील रोगप्रतिकराशक्ती वाढविण्यासाठी फायद्याचं ठरणार आहे. खजूरमध्ये विटॅमिन, मिनरल आणि फायबर जास्त प्रमाणात असल्याने खजूर खाणंही फार फायद्याचं आहे..

दरम्यान, या सर्व पदार्थांसोबतचं रताळे, आवळा यासारख्या गोष्टीचं थंडीत सेवन केल्यास फायदा मिळतो. मोसंबी, संत्रे, लिंबू यासारख्या आंबट फळे खाल्ल्यानेही रोगप्रतिकारशक्ती मोठ्या प्रमाणात वाढते. या फळांमध्ये विटॅमिन- सीचं प्रमाण जास्त प्रमाणात असल्याने ही फळं खाणं गरजेचं आहे.

थोडक्यात बातम्या-

“वेळ आली तर…”; राजेश टोपेंचा महाराष्ट्राला मोठा इशारा

नाईट कर्फ्यूबाबत वैज्ञानिकांचा धक्कादायक खुलासा, म्हणाले…

आरोग्य सचिवांचं कोरोनाबाबत धक्कादायक वक्तव्य, म्हणाले…

‘कोरोना महामारीच्या अनेक लाटा येतील कारण…’”; तज्ज्ञांचा धक्कादायक खुुलासा

“नवीन वर्षाचा संकल्प हा महाविकास आघाडी सरकार घालवायचा आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More