बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘लस घेतल्यानंतर 20 दिवसांनी ही लक्षणं दिसली तर…’; तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा

नवी दिल्ली | कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. लसीकरण आता या संकटातून बाहेर काढण्याचं एकमेव शस्त्र असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता लसीकरण झाल्यानंतरही 20 दिवसांत काही लक्षण दिसून येतात त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं काही सूचना जारी केल्या आहेत.

कोरोना लसीकरणाविषयी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या सूचना ‘कोविड न्यूज बाय एमआयबी’ या ट्विटरवर शेअर करण्यात आल्या आहेत. यामध्ये त्यांनी कोरोना लसीकरण केल्यानंतर 20 दिवसांनी उद्भवणाऱ्या लक्षणांविषयी सांगितलं आहे. त्यामुळे लसीकरणानंतर जर गंभीर लक्षणं दिसली तर डाॅक्टरांचा सल्ला घेण्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

जारी केलेल्या सूचनांमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं की, लसीकरण घेतल्याच्या 20 दिवसांनंतर छाती दुखणं, पोटात दुखणं, डोकं दुखणं, उलटी होणं, लस घेतल्या जागी रक्ताच्या खुणा जाणवणं, अशी लक्षणं आढळल्यास तात्काळ डाॅक्टरांचा सल्ला घ्या.

दरम्यान, सामान्यतः लसीकरण केल्यावर दोन-तीन दिवस त्रास होऊन लोक बरे होतात. मात्र जास्त दिवस त्रास जाणवत असेल तर डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा. याविषयी घाबरण्याचं काही कारण नसल्याचंही आरोग्य तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

नोकरी मिळवण्यासाठी पठ्ठ्याची भन्नाट कल्पना; केलं असं काही की…, पाहा व्हिडीओ

करुणा शर्मांनी धनंजय मुंडेंवर केले गंभीर आरोप, म्हणाल्या…

वळणाचं पाणी वळणाला गेलं, तालिबानच्या मदतीला पाकिस्तान धावलं, पंजशीरवर पाकिस्तानचा हल्ला!

कोरोनानंतर आता ‘या’ विषाणूची दहशत, मुलाच्या मृत्यूनं चिंतेत वाढ!

“लाचखोर नवऱ्याची बायको म्हणून तुमची राज्याला ओळख, नीतिमत्ता कुणाला शिकवता?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More