बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘वे डरते हैं…’; कविता ट्विट करत जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

मुंबई | सध्या दिल्लीत पावसाळी अधिवेशन सुरू आहे. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात विरोधकांनी गोंधळ घातला. त्यानंतर सभागृहात मार्शल बोलण्यात आले आणि 40 खासदारांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर मार्शल आणि खासदारांनी एकमेकांवर आरोप केले. तर दुसरीकडे ट्विटरने राहुल गांधी यांच्या आणि काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर कारवाई करत अकाऊंट लाॅक केलं आहे. त्यानंतर काँग्रेस आणि सर्वच विरोधीपक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

जयंत पाटील यांनी एक कविता ट्विट करत केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. प्रसिद्ध कवी गोरख पाण्डेय यांची कविता जयंत पाटलांनी ट्विट केली आहे. ‘उनका डर’ हे या कवितेचं शिर्षक आहे. या कवितेच्या माध्यमातून त्यांनी जनतेची सध्याची मानसिकता, सध्याचं राजकीय वातावरण, देशात असलेली आर्थिक स्थितीवर भाष्य करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

त्यांनी ट्विट केलेली कविता-

उनका डर

किस चीज़ से डरते हैं वे

तमाम धन-दौलत गोला-बारूद पुलिस-फ़ौज के बावजूद ?

वे डरते हैं

कि एक दिन निहत्थे और ग़रीब लोग

उनसे डरना बंद कर देंगे

दरम्यान, राज्यसभेत झालेल्या गदारोळानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकावर घणाघाती टीका केली होती. सरकारने विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. माझ्या 55 वर्षांच्या कारकिर्दीत असं कधीही घडलं नाही, अशी टीका शरद पवारांनी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदारांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘आमदाराच्या मुलीला थार गाडी द्या’; सनी देओलचं थेट आनंद महिंद्रांना पत्र

भागवत कराडांपेक्षा माझी उंची खूप मोठी, त्यांची माझ्याशी तुलनाच होऊ शकत नाही- चंद्रकांत खैरे

कोरोनाची ‘ही’ लस ठरतेय धोकादायक; अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर

…म्हणून पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने गावात वाटले चक्क कंडोम!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More