‘माझ्यासारखे सेक्सी कपडे घालतात ते…’; नीना गुप्तांनी शेअर केला ‘तो’ व्हिडीओ
मुंबई | बाॅलिवूड म्हटलं की ग्लॅमरस आयुष्य, लाईफस्टाइल आलीच. नेहमी कोणत्या न कोणत्या कारणावरुन बाॅलिवूडमधील कलाकार चर्चेत असतात. जेवढी जास्त चर्चा तेवढंच जास्त ट्रोल करणंही आलंच. त्यामुळे प्रत्येक कलाकाराला प्रशंसा आणि टोमण्यांचा सामना हा करावाच लागतो.
बाॅलिवूडमधील अभिनेत्री नीना गुप्ता या नेहमीच चर्चेत असतात. त्या त्यांच्या पर्सनला आणि सोशल दोन्ही आयुष्यामुळे चर्चेत असतात. अशातच आता निना गुप्तांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे.
62 वर्षाच्या नीना गुप्ता त्यांच्या स्टायलीश कपड्यांमुळे चर्चेत असतात. यादरम्यान त्यांना ट्रोलिंचाही सामना करावा लागतो. त्यामुळे या व्हिडीओमधून नीना गुप्ता यांनी ट्रोलर्सला सुनावलं आहे. मला हे पोस्ट करणं गरजेचं वाटतंय. लोकांना असं वाटतं की सेक्सी अंगप्रदर्शन करणारे कपडे घालणारे लोक वाईट असतात. जसे की मी आता घातलेत. त्या लोकांना मी सांगू इच्छिते की, हा चुकीचा विचार आहे.
कपड्यांवरून एखाद्याबद्दल तुमचं मत तयार करू नका, त्याची पारख करू नका, ट्रोल करणाऱ्यांनो हे लक्षात ठेवा, असं नीना यांनी व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
पाहा व्हिडीओ –
View this post on Instagram
थोडक्यात बातम्या –
कोरोनाविषयी अजित पवारांनी दिला ‘हा’ गंभीर इशारा, म्हणाले…
‘या नियुक्त्या तुमच्याच सरकारच्या काळातील…’; अजित पवारांचं फडणवीसांना प्रत्युत्तर
‘2024 पर्यंत अमेरिकेच्या बरोबरीने….’; नितीन गडकरींचं मोठा प्लॅन
धक्कादायक! चीननंतर आता ‘या’ ठिकाणी होतोय कोरोनाचा उद्रेक
शेतकऱ्यांसाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची आणखी एक मोठी घोषणा, म्हणाले…
Comments are closed.