बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“एकमेकांवर चपला फेकतील की पुष्पहार अपर्ण करतील, हे तेच ठरवतील”

मुंबई | रविवारी शिवसेना पक्षाचा 55 वा वर्धापन दिन पार पडला. पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह येत शिवसैनिकांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मोलाचं मार्गदर्शन करण्याबरोबरच चौफेर फटकेबाजी देखील केली होती. यावेळी अनेक विषयावर भाष्य करत उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधला होता. उद्धव ठाकरेंच्या या भाषणावरुन आता भाजपने त्यांच्यावर टीका केली होती.

काँग्रेसकडून आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिला जात आहे. यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.  भाजपही स्वबळावर निवडणूक लढवू शकतं. हे महाविकास घाडीला ठरवायचं आहे, की ते कोणासोबत युती करतील? एकमेकांवर चपला फेकतील की पुष्पहार अपर्ण करतील, हे तेच ठरवतील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळावर लढण्याचं जाहीर वक्तव्य केलं होतं. ‘अनेक पक्ष स्वबळाचा नारा देत आहेत. स्वबळ केवळ निवडणुका लढवण्यासाठी असू नये. स्वबळ हे अभिमानाचं, स्वाभिमानाचं असावं. आम्ही देखील स्वबळाचा नारा देऊ, स्वबळावर लढणं हा आमचा हक्क आहे’, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी  काँग्रेसवर टीका केली होती.

दरम्यान, अजूनही आम्ही हिंदुत्ववादी आहोत असं मुखमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं नाही मग महाशिव आघाडीची महाविकास आघाडी कशी झाली?, असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला होता.

थोडक्यात बातम्या-

पुण्यातील गर्दीला अजित पवार जबाबदार, त्यांच्यावरही गुन्हा दाखल करा- प्रविण दरेकर

“मी राज श्रीकांत ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…, हे वाक्य कानावर पडेल तो सुवर्ण दिवस असेल”

दिलासादायक बातमी! एकदा कोरोना होऊन गेल्यावर दुसऱ्यांदा संक्रमणाचा धोका कमी

कोरोना काळात शेतकरी बांधव राबला म्हणून इतर जगू शकले- विजय वडेट्टीवार

‘फादर्स डे’ निमित्त रियानं मागितली वडिलांची माफी, म्हणाली….

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More