बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारताच्या खात्यात तिसरं पदक; अवघ्या 23व्या वर्षी लवलिनानं रचला इतिहास

टोकियो | 23 जुलैपासून टोकियो ऑलिम्पिकला सुरूवात झाली आहे. ऑलिम्पिक स्पर्धेच्या बाॅक्सिंगमध्ये मेरी काॅम आणि मनु भाकरसारखे दिग्गज खेळाडू फेल ठरले आहेत. त्यानंतर स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारतीय बाॅक्सर लवलीना बोर्गोहेनने भारतासाठी पदक निश्चित केलं होतं. चिनी तायपेच्या निएन चिन चेनवर मात करत ती सेमीफायनलमध्ये पोहोचली होती. त्यानंतर आजच्या सामन्यात लवलीनाचा दारूण पराभव झाला आहे.

आज तुर्कीच्या बुसेनाज सुरमेनेलीसोबत लवलीना बोर्गोहेनचा सामना रंगला. बुसेनाज सुरमेनेली ही जागतिक स्तराची अव्वल बाॅक्सर आहे. 69 किलो वजनी गटाचा हा सामना रंगला होता. सामन्याच्या सुरूवातीला लवलीनाने आक्रमक खेळी केली. पहिल्या डावात भारत आघाडीवर राहिल असं दिसत होतं. पण पंचांनी निर्णय तुर्कीच्या बाजूने लावला. त्यामुळे बुसेनाजला आघाडी मिळाली.

बुसेनाजने पहिला डाव खिश्यात घातल्यानंतर देखील तिने आक्रमक खेळी सुरू ठेवली. अखेर तिने हा सामना 5-0 असा जिंकला. पराभूत होऊन देखील तिचं कांस्यपदक निश्चित होतं. ऑलिम्पिकच्या बाॅक्सिंग पराभूत झालेल्या खेळाडूंना कांस्यपदक दिलं जातं. परंतु, लवलीनाचं सुवर्ण पदकाचं स्वप्न भंगलं आहे.

दरम्यान, ऑलिम्पिक खेळात पदक जिंकणारी लवलीना ही तिसरी खेळाडू ठरली आहे. याआधी 2008 साली झालेल्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये विजेंदर सिंगने कांस्यपदक जिंकलं होतं. त्यानंतर 2012 साली भारतीय बाॅक्सर मेरी कोमने कांस्यपदक जिकलं होतं. त्यानंतर आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये लवलीना बोर्गोहेनने कांस्यपदक आपल्या नावावर केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

भारतीय कुस्तीपटूंचा निर्णायक डाव; दीपक पुनिया आणि रवी दहिया सेमीफायनलमध्ये दाखल

MPSCच्या उमेदवारांसाठी मोठी बातमी; अखेर परीक्षेची तारीख ठरली

करदात्यांना सरकारचा दिलासा; केली ‘ही’ घोषणा

अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणी गहना वशिष्टला कोर्टाकडून आणखी एक झटका!

मनसुख हिरेन मृत्यु प्रकरणात एनआयएचा धक्कादायक दावा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More