बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खळबळजनक! आणखी एका रूग्णालयातील 35 डॉक्टरांना लस घेतल्यानंतरही झाली कोरोनाची लागण

नवी दिल्ली | दिल्लीतील एम्स रुग्णालयातील 35 डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. गेल्या आठवडाभरात ऑल इंडिया इन्स्‍टीट्यूट ऑफ मेडिकल साइन्सेजमझधील 35 डॉक्टर कोरोना संक्रमित झाल्याची माहिती दिली आहे.

ज्युनिअर, सीनिअर, स्पेशालिस्ट अशा सर्व डॉक्टर्सचा समावेश आहे. बहुतेकांमध्ये सौम्य लक्षणं दिसत आहेत. त्यामुळे काही डॉक्टरांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या डॉक्टरांनी कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला आहे. तसेच 50 पेक्षा जास्त आरोग्य कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं कळतंय.

याआधी सर गंगाराम रुग्णालयात 37 डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह सापडलेत. त्यापैकी पाच जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर इतरांना होम आयोसेलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. यापैकी बहुतेक डॉक्टर हे कोरोना रुग्णांवर उपचार करत होते. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या सर्व डॉक्टरांमध्ये सौम्य लक्षणं आहेत, कुणाचीही प्रकृती गंभीर नाही.

दरम्यान, मागील 24 तासात दिल्लीत 7437 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, कोरोनामुळे चोवीस जणांचा मृत्यू झाला आहे. आता दिल्ली कोरोनाबाधित अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 23181 वर पोहोचली आहे.

थोडक्यात बातम्या- 

आरोपांकडे लक्ष देऊ नका, कामावर भर द्या- नरेंद्र मोदी

नागपूरच्या वेल ट्रीट कोरोना रुग्णालयाला आग; 4 जणांचा मृत्यू

” उद्धव ठाकरेंना 40 दिवसांमध्ये मुख्यमंत्रीपद सोडावं लागेल”

जम्बो कोविड सेंटर खासगी रुग्णालयांनी दत्तक घ्यावेत- उद्धव ठाकरे

महाराष्ट्र कडक लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर, राज्य सरकार कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More