बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाबो! ‘या’ अभिनेत्रीला कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्याचा झालाय एवढा आनंद, म्हणते…

मुंबई | सध्या देशात कोरोनाने थैमान घातलं आहे. सामान्य माणुसच नव्हे तर मोठ-मोठ्या कलाकारांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. अनेक कलाकारांनी या महामारीमुळे आपला जीव देखील गमावला आहे. अशातच आता बिग बाॅस फेम आणि प्रसिद्ध अभिनेत्री रुबिना दिलैकला देखील कोरोनाची लागण झाली आहे. मात्र आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचा आनंद रुबिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन व्यक्त केला आहे.

रुबिना दिलैक ही बिग बाॅस 14 ची विजेता आहे. हा रियॅलिटी शो संपून काहीच महिने झाले आहेत. अशातच रुबिनाची कोरोना चाचणी सक्रीय आली आहे. कोरोनाला न घाबरता आपल्याला कोरोना झाला असल्याचा आनंद रुबिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन व्यक्त केला आहे. तिने याबाबतची एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिला कोरोनाची लागण झाली असून आता एक महिन्यानंतर तिला तिचा प्लाझमा डोनेट करता येईल, या कारणामुळे जास्त आनंद होत असल्याचं म्हटलं आहे.

रुबिनाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये आता ती 17 दिवस घरीच क्वारंटाईन असल्याचं देखील तिने सांगितलं आहे. तसेच गेल्या 5 ते 6 दिवसात जे लोक तिच्या संपर्कात आले आहेत अशांनी त्यांची कोरोना चाचणी करुन घ्यावी असं देखील त्यामध्ये लिहलं आहे.

दरम्यान, रुबिना सध्या कलर्स वाहिनीवरील ‘शक्ती’ या मालिकेमध्ये काम करत आहे. तसेच बिग बॉस नंतर ती आपल्या पहिल्या ‘मरजानियां’ या अल्बममध्ये झळकली होती. रुबिनाचा पारस छाब्रासोबत ‘गलत’ हा अल्बमही नुकताच रिलीज झाला आहे.

थोडक्यात बातम्या-

“अंगावरचे सगळे कपडे काढ” दिग्दर्शकाने केलेल्या विचित्र मागणीचा ‘या’ अभिनेत्रीने केला खुलासा

चिंताजनक! गेल्या 24 तासात देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय वाढ

दिलासादायक! नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं

राज्यातील ‘ही’ दुकानं आता आठवड्यातील 7 दिवस सुरू राहणार; राज्य सरकारची मोठी घोषणा

पंढरपुर विधानसभा मतदारसंघाचं भवितव्य आज ठरणार; चुरशीच्या लढतीत कोण होणार विजयी?

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More