बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जम्बो कोविड सेंटर खासगी रुग्णालयांनी दत्तक घ्यावेत- उद्धव ठाकरे

मुंबई | सध्या राज्यात कोरोना रुग्णांना बेड मिळण्यास अडचणी येत आहे, तर त्याचबरोबर राज्यात मनुष्य बळाची कमतरता दिसून येत आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व नामांकित खासगी रुग्णालयांच्या संचालकांशी आणि तज्ज्ञांशी व्हिडीओ काॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला आहे.

कोरोना चाचण्यांमध्ये, लसीकरणात, सुविधा उभारणीमध्ये आणि दर्जेदार रुग्णसेवा देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य क्रमांक एकवर आहे. महाराष्ट्र एकवटतो तेव्हा तो जिंकतो. कोरोनाविरुद्ध अशाचप्रकारे एकवटून त्याला हरवूया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील खासगी रुग्णालयांचे संचालक, तज्ज्ञ डॉक्टर्स यांना केलं.

गेल्या वर्षभरापूर्वी कोरोनाशी युद्ध पुकारले ते सुरूच आहे. प्रत्यक्ष युद्ध लढणाऱ्या सैनिकांप्रमाणे आपण सारे दिवस रात्र रुग्णसेवा करीत आहात. कोरोनाच्या या कठीण काळात खासगी रुग्णालयांनी आपल्या सुविधा वाढवून रुग्णांना दिलासा द्यावा. शासनाने जम्बो कोविड सेंटर्स उभारले आहेत त्यातील काही खासगी रुग्णालयांनी दत्तक घ्यावा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

उपचाराच्या सुविधा वाढवताना मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी जे डॉक्टर्स, नर्स निवृत्त झाले आहेत त्यांना पुढील तीन किंवा सहा महिन्यांसाठी सेवेत सामावून घेण्याविषयी प्रयत्न करावेत, असं वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांंनी सागितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! ‘या’ काँग्रेस आमदाराचं कोरोनामुळे निधन

डिविलिअर्सच्या झंझावातापुढे मुंबई निष्प्रभ, अटीतटीच्या सामन्यात RCBचा विजय

‘त्या’ चेंडूनं केला विराट कोहलीचा घात, उजवा डोळाच केला लाल!

बंगळुरुच्या ‘या’ खेळाडूनं मोडली मुंबईची कंबर, निम्मी टीम पाठवली माघारी!

…म्हणून मुंबई इंडियन्सचे समर्थक म्हणतात, पहिली मॅच आम्हाला हरायचीय!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More