Top News नागपूर महाराष्ट्र

‘या’मुळे औरंगाबाद आणि नागपूरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीत बंडखोरीची शक्यता

नागपूर | नागपूर आणि औरंगाबादमध्ये पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या उमेदवारीवरून आता आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे दिसत आहेत. दोन्ही जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांना सहकार्य करण्यास तयार नाहीत.

एवढेच नाहीतर दोन्ही ठिकाणी परस्परांविरोधात बंडखोर उमेदवार उभे केले जाण्याची शक्यता आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या अभिजीत वंजारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र हा मतदारसंघ काँग्रेसला सोडल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.

तर औरंगाबादमध्येही महाविकास आघाडीतील परिस्थीती फारशी ठीक नाही. याठीकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा द्यायचा की नाही यावरुन काँग्रेसचे अद्याप तळ्यात-मळ्यात सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या-

बिहारमध्ये शिवसेनेचं डिपॉझिट गुल.. कुठे गेला चमत्कार?; किरीट सोमय्यांनाचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

“बिहारमध्ये सत्ता स्थापनेसाठी नितीश कुमारांनी शरद पवारांचा सल्ला घ्यावा”

कोरोनाला सणवार-दिवाळी कळत नाही; मुख्यमंत्र्यांचं जनतेला आवाहन

बिहारच्या विजयी सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘या’ नेत्याला दिला मोठा इशारा

‘हा’ नेता बनणार बिहारचा मुख्यमंत्री?; नरेंद्र मोदींच्या भाषणात स्पष्ट संकेत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या