बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ठाकरे सरकार फक्त एकाच विषयावर गंभीर आहे ते म्हणजे…”

मुंबई | राज्यात सध्या सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये विविध विषयांवरून जबरदस्त शाब्दिक युद्ध चालू आहे. एनसीबीची कारवाई, ईडी, आयकर विभाग यांच्या कारवाया यावरून महाविकास आघाडीनं भाजपवर जोरदार प्रतिहल्ले केले आहेत. राज्य सरकारवर भाजपतर्फे सातात्यानं टीका करण्यात भाजप नेत्या चित्रा वाघ आघाडीवर आसतात. आताही चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारला चांगलंच घेरलं आहे.

राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सध्या वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे. यावरूनच चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. चऱ्होली पुणे 5 वर्षीय मुलीवर बलात्कार तर नाशिक 42 वर्षांच्या महिलेवर सामूहिक बलात्कार रोज राज्यात महिलामुलींच्या अब्रूचे लचके तोडले जात आहेत. ज्या बाबत सरकारला गांभिर्य नाही, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

हे सरकार फक्त एकाचं विषयावर गंभीर आहे ते म्हणजे ‘आमचं सरकार खंबीर आहे’, अशी जहरी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे. परिणामी चित्रा वाघ पुन्हा आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाच्या रिक्त असलेल्या अध्यक्षपदावरून जोरदार टीका केली होती. सरकारनं सध्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांच्या खांद्यावर सोपवली आहे.

दरम्यान, महिला अत्याचाराबाबत गंभीर असल्याचं राज्याचे गृहमंत्री काही दिवसांपूर्वी म्हणाले आहेत. राज्यातील सर्व वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गृहमंत्र्यांनी एक बैठक घेऊन महिला सुरक्षेचा आढावा घेतला होता. अशातच आता चित्रा वाघ यांच्या टीकेवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून काय उत्तर येत ये पहावं लागेल.

पाहा ट्विट-

थोडक्यात बातम्या 

“…मग विराट कोहलीला अटक करणार का?”

एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली तर मी स्वत:… – गोपीचंद पडळकर

राज्यातील ‘लाल परी’ वाहतूक बंद; एसटी कर्मचाऱ्यांचे उपोषण आंदोलन

विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! MPSCची ‘इतक्या’ जागांसाठी जम्बो पदभरती

मी भाजप पुरस्कृत असतो तर… – खासदार संभाजीराजे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More