बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूीवर पुण्याच्या महापौरांनी घेतला हा महत्त्वाचा निर्णय

पुणे | कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. दिवसाला रोज हजारांपेक्षी नवीन लागण झालेल्यांची संख्या वाढत्या आलेखाप्रमाणे वाढताना दिसत आहे. यामुळे राज्य सरकारनेही जमावबंदीचा निर्णय घेतला आहे तर राज्यातील चित्रपटगृृह, हॉटेल, समुद्र किनाऱ्यावरसह बारवर निर्बंध घालण्यात आले आहेत. पुण्यातही कोरोनाचे आकडेही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मोठा निर्णय घेतला आहेे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत पुण्यातील प्रमुख रुग्णालयात बेड कमी पडले होते. कारण रूग्णांना दाखल करण्यासाठी बेडच उपलब्ध नव्हते. याचीच खबरदारी म्हणून खासगी रुग्णालयात 80 टक्के बेड्स कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घेतला आहे. याबाबत ट्वविट करत त्यांनी माहिती दिली आहे.

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व खासगी दवाखान्यातील 80 टक्के बेड्स कोविड उपचारासाठी उपलब्ध करुन देण्याबाबतचे आदेश आज काढण्यात आले आहेत. 31 मार्चपासून हे बेड्स कोविड रुग्णांना उपलब्ध होणार असल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, पुण्यामध्ये आज दिवसभरात 2 हजार 574 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 2 हजार 771 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 32 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. तर 8 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत.

 

थोडक्यात बातम्या- 

पुण्यासाठी आजचा दिवस जरा बरा, एवढ्या कोरोना रुग्णांची नोंद

भारत नानांवर प्रेम करणारी जनता भगीरथ भालके यांना विजयी करणारच- सुप्रिया सुळे

शेकाप आमदार जयंत पाटील यांना लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण

मोदींच्या बांग्लादेश दौऱ्यानंतर शेख हसीनांची ‘ती’ साडी चर्चेत; जाणून घ्या कारण

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानंतर बांगलादेशमधील वातावरण खवळलं

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More