बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ही घटना तर जालियनवाला बागची पुनरावृत्ती’; लखीमपूर घटनेवरून शरद पवारांचा हल्लाबोल

मुंबई | लखीमपूर येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना अमानुषपणे गाडीने चिरडल्याचं प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे. या प्रकरणात मोठ्या प्रमाणात तीव्र प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत. तसेच उत्तरप्रदेश सरकारवरही टीकेची झोड उठली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात राजकीय वातावरण तापलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या घटनेची तुलना थेट जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली आहे. तसेच त्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. लखीमपूरमध्ये झालेल्या हत्येची पुर्ण जबाबदारी ही सरकारची आहे, असं म्हणत त्यांनी सरकारवर टीकास्त्र डागलं.

लखीमपूरमध्ये घडलेली घटना दुर्दैवी असून ही घटना जालियनवाला बाग हत्याकांडासारखीच आहे, असं शरद पवारांनी बोलुन दाखवलं. तसेच या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. केंद्र सरकार व उत्तर प्रदेश राज्य सरकार हे अत्यंत असंवेदनशिल असून या घटनेतून सरकारची वृत्ती कळते, असा घणाघात शरद पवारांनी केला आहे.

शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनीही ही घटना अत्यंत लांछनास्पद असल्याचं म्हणत या घटनेमुळे आम्ही अस्वस्थ आहोत, असं बोलून दाखवलं. त्यामुळे संपुर्ण देशभरातून आता या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. दोषींवर कारवाई करा म्हणून काँग्रेसनेही चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला आहे. तसेच या घटनेचा एक व्हिडीओ प्रियंका गांधींकडून ट्विट करण्यात आला आहे, जो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

 

थोडक्यात बातम्या

शाहरुखच्या मुलाआधी ‘या’ दिग्गज अभिनेत्याच्या मुलाला ड्रग्जप्रकरणी झाली होती अटक

“अमरिंदर सिंग भाजपला मदत करतायेत अन्…”, काँग्रेसचा हल्लाबोल

पेट्रोल-डिझेल पाठोपाठ नॅच्युरल गॅसच्या किंमतीतही वाढ; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

खनिज तेलाची गेल्या 7 वर्षातील उच्चांकी, भारतातील पेट्रोल आणि डिझेलवर मोठा परिणाम

दिलासादायक! देशातील नव्या कोरोना रूग्णसंख्येत 209 दिवसातील निच्चांकी नोंद 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More