बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एमपीएसीच्या रिक्त जागांबाबत अजित पवारांनी केली ‘ही’ मोठी घोषणा!

मुंबई | स्वप्नील लोणकर या एमपीएससी उमेदवाराच्या आत्महत्येनंतर आज विधानसभेत एमपीएससीचा मुद्दा विरोधी पक्षाने जोरदार लावून धरला. स्वप्नील लोणकर यांच्या कुटुबीयांना 50 लाखांची मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी लावून धरली. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात मोठी घोषणा केली आहे.

एमपीएससीच्या रिक्त असलेल्या जागा भरणार, अशी घोषणा विधानसभेत अजित पवार यांनी केली. त्यांनी विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार यांनी ही घोषणा केली. विरोधकांनी या मुद्द्यावर गदारोळ घातल्यानंतर 31 जुलैपर्यंत MPSCच्या सर्व रिक्त जागा भरू, असं आश्वासन अजित पवार यांनी दिलं आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणारा विद्यार्थी स्वप्नील लोणकर याच्या आत्महत्येचा मुद्दा विधानसभेत गाजला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेत आक्रमक झालेले पाहायला मिळाले आहेत.

दरम्यान, दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण तसेच इतर मुद्द्यांवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे. तर याच अधिवेशनात सत्ताधारी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण तसेच केंद्रीय कृषी कायद्यांसंदर्भात प्रस्ताव मांडण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘स्वप्निल लोणकरच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत द्या’; सुधीर मुनगंटीवारांची सरकारकडे मागणी

‘सरकारनं लोकशाहीला कुलूप लावलं’; प्रश्नोत्तरं, तारांकित प्रश्न नसल्यानं देवेंद्र फडणवीसांचा आक्षेप

आता ‘या’ लसीची निर्मिती भारतात होणार ; DGCI कडून अधिकृत मान्यता

‘सरकारच्या डोक्यात घालण्यासाठी हे पुस्तक आणलंय’; राम सातपुते आक्रमक

‘विद्यार्थ्यांना वास्तवाचं भान असलं पाहिजे’; कलेक्टर कौस्तुभ दिवेगावकर यांची पोस्ट व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More