बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

डेल्टा प्लस व्हेरिएंटपासून सुरक्षिततेसाठी AIIMSच्या संचालकांनी सांगितला हा मोठा पर्याय!

नवी दिल्ली | कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं चित्र असतानाच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. अशात एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी एक महत्वाची माहिती दिली आहे. डेल्टा प्लस सारख्या व्हेरिएंटविरोधात लढण्यासाठी लशींचं मिश्रण एक पर्याय असू शकतो. यावर कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी आपल्याला आणखी डेटा एकत्रित करणं आवश्यक आहे, असं डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं आहे.

डेल्टा व्हेरिएंटविरूद्ध कदाचित सिंगल डोस पुरेसा ठरणार नाही. संशोधनातही सांगण्यात आले आहे, की सिंगल डोस केवळ 33 टक्केच संरक्षण देतो. जेव्हा दोन्ही डोस दिले जातात तेव्हा लोकांना 90 टक्के सुरक्षा मिलते. तसेच, डेल्टा व्हेरिएंटविरूद्ध कदाचित सिंगल डोस पुरेसा ठरणार नाही, ही आपल्यासाठी चिंतेची गोष्ट आहे. अशात आपल्याला दुसरा डोस देण्याची आवश्यकता आहे. पण तो फार आधीच द्यावा लागेल. जेणे करून सर्वांची सुरक्षितता निश्चित करता येईल, असंही गुलेरिया म्हणाले.

कोणतं मिश्रण चांगलं असेल, यावर आणखी संशोधनाची आवश्यकता आहे. पण हो, ही निश्चितपणे एक शक्यता आहे. लशींच्या मिश्रणावर इतर देशांतही प्रयोग सुरू आहेत, असं डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले.

तिसऱ्या लाटेसंदर्भात बोललं जात आहे की तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेच्या तुलनेत अधिक घातक ठरेल. पण माला वाटतं की येणारी लाट तेवढी घातक नसेल. आपल्याला दुसऱ्या लाटेपासून धडा घेत तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागेल, असं डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या- 

‘ज्याने त्याने ज्याचा त्याचा पक्ष वाढवावा, पण…’; गुलाबराव पाटील यांचं आवाहन

दिलासादायक! मुंबईतील कोरोना आटोक्यात; कोरोनामुक्तीचा दर पोहोचला 96 टक्क्यांवर

राज्यात आज विक्रमी लसीकरणाची नोंद! तब्बल ‘एवढ्या’ नागरिकांनी घेतली लस

शेतकऱ्यांची पुढील लढाई केव्हा आणि कुठे होईल? राकेश टिकैत म्हणाले…

महाराष्ट्रातील कोरोनाचं हाॅटस्पाॅट ठरलेल्या ‘या’ जिल्ह्यात आज अवघ्या 18 कोरोनाबाधितांची नोंद

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More