मुंबई | 8 तासांच्या चौकशीनंतर ईडीनं अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक केली. नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीचे कार्यक्रते आक्रमक झाले असून नेतेही केंद्रीय यंत्रणांवर हल्लाबोल करत आहे. अशातच आता नवाब मलिकांच्या अटकेनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संपूर्ण देश पाहत असून त्यांना काय सुरु आहे याची माहिती आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये काय सुरु आहे हे संपूर्ण देश पाहत आहे. ही कायदेशीर आणि राजकीय लढाई असून आम्ही लढू, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
एखाद्या कॅबिनेट मंत्र्याला अनपेक्षितपणे केंद्रीय तपास यंत्रणेने सुडबुद्धीने कारवाई केली असेल, तर त्या संदर्भात संपूर्ण मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार भेटणार असतील तर त्यात चुकीचं काय?, असा सवालही संजय राऊत यांनी विचारला आहे.
दरम्यान, नवाब मलिक यांच्या अटकेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. आता पुढे काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
थोडक्यात बातम्या –
दहावी बारावीच्या परिक्षांसंदर्भात सुप्रीम कोर्टानं दिला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय
“मुख्यमंत्र्यांनी तातडीने नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा…”
“सत्तेच्या माडीसाठी ईडीची शिडी, विनाकारण मारी धाडीवर धाडी”
“अनिल देशमुख यांच्यानंतर नवाब मलिक आणि आता तिसरा नंबर….”
“पवारसाहेब मोठे नेते आहेत, त्यांना आम्ही काय सांगणार?”
Comments are closed.