बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत WHO नं दिला हा गंभीर इशारा!

नवी दिल्ली | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत जागतिक आरोग्य संघटनेचे टेड्रोस अधनोम यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. कोरोना व्हायरसची तिसरी लाट सुरुवातीच्या टप्प्यात पोहोचली आहे, असं टेड्रोस अधनोम यांनी म्हटलंय.

डेल्टा व्हेरिअंट हा सध्या नसला तरी लवकरच जगातील सर्वात खतरनाक व्हेरिअंट बनेल. कारण हा कोरोना व्हायरस सतत विकसित होत आहे आणि आपले रुप बदलत आहे. यामुळे वेगाने संक्रमण पसरविणारे व्हेरिअंट जगभरात बनू लागले आहेत, असं टेड्रोस अधनोम यांनी सांगितलं आहे.

लसीकरण सुरु झाल्यामुळे काही काळापुरते कोरोना रुग्णांच्या संख्येत घट दिसली होती, मात्र आता पुन्हा हे रुग्ण वाढू लागले आहेत, असं टेड्रोस अधनोम म्हणाले. जगातही कोरोना रुग्ण वाढत असून टेड्रोस अधनोम यांनी केलेल्या वक्तव्याने जगभराची चिंता वाढली आहे.

दरम्यान,देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 3 हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात 41 हजार 806 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने आणि कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.

थोडक्यात बातम्या- 

“…तर राहुल गांधी आजच्या युगातले तेनाली रामन असावेत”

कोरोना लस घेतल्यानंतर परिणीती चोप्राची झाली ‘अशी’ अवस्था!

नेहा कक्कर गरोदर?; एअरपोर्टवरील लूक पाहून चाहत्यांना पडला प्रश्न

“किती दिवस भावी पंतप्रधान राहू, किमान राष्ट्रपतीपदाचा उमेदवार तरी बनवा”

आंगावर काटा आणणारा व्हिडीओ, हात निसटला अन् ती थेट 9व्या मजल्यावरुन खाली कोसळली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More