बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अफगाणिस्तान सोडून पळालेल्या अश्रफ घनींना तालिबानकडून खास ऑफर, घनी स्वीकारणार?

काबुल | अफगाणिस्तानवर सत्ता मिळवल्यानंतर तालिबान आता आपण किती चांगले आहोत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. तालिबानचे दहशतवादी हे खुलेआम फिरत आहेत. अफगाणिस्तानचा पंजशीर प्रांत सोडून सर्वत्र तालिबानने आपले दहशतवादी सुरक्षा रक्षकांसारखे तैनात केले आहेत. काबुलसह इतर महत्वाच्या भागात तालिबान विशेष लक्ष ठेवून आहे.

अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घनी हे देश सोडून पळून गेले आहेत. आपल्या देशातील नागरिकांचे हाल मला बघवत नाहीत असं वक्तव्य अश्रफ घनी यांनी केलं होतं. उपराष्ट्रपती अमरूल्लाह सालेह हे पंचशीर प्रांतात आहेत. तेथून ते तालिबान विरोधात आपली मोहिम राबवत आहेत.

तालिबानचे नेते खलील उर रहमान हक्कानी म्हणाले की, अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी आणि उपराष्ट्रपती  अमरुल्लाह सालेह यांना आम्ही एक ऑफर दिली आहे. तालिबानने या दोन्ही नेत्यांसंदर्भात सामंजस्याची भूमिका घेतली आहे. तसेच या दोन्ही नेत्यांना अफगाणिस्तानमध्ये परतायचं असल्यास ते परत येऊ शकतात, असंही तालिबानने म्हटलं आहे. आमचं कुणाशीही कसलंचं वैर नाही. सर्वांशी आम्ही चांगलं वागतोय, असंही ते म्हणाले.

तालिबान मानवतेचा पुजारी असल्यासारखं त्यांचे दहशतवादी बोलत आहेत. अशरफ घनी, अमरुल्लाह सालेह आणि हमदुल्लाह मोहिब यांना तालिबानने माफ केलं आहे असंही हक्कानी यांनी सांगितलं. हक्कानी यांनी आम्ही सर्वांना माफी दिल्याचं म्हटलं आहे. यामध्ये आतापर्यंत तालिबानविरोधात लढणारे सैनिक, अफगाणिस्तानमधील तालिबानला यापूर्वी विरोध करणारे नागरिक या आम्ही सर्वांनाचं माफ केलं आहे, असंही हक्कानी यावेळी म्हणाला आहे.

थोडक्यात बातम्या 

पुढचे ‘इतके’ दिवस पावसाची दडी, वाचा हवामान खात्याचा अंदाज

पंजशीरचे वाघ तालिबानवर पडले भारी; 300 तालिबान्यांना केलं ठार

“काल-परवा भाजपत घुसले आणि मंत्रीपदाची हळद लावून बोहल्यावर बसले”

“राणेंना सूक्ष्म उद्योग खातं मिळालं, त्यामुळे त्यांचं डोकंही सूक्ष्म झालं”

“आधी देश, मग पक्ष म्हणणाऱ्या भाजपने पक्षाच्या झेंड्याखाली देश गुंडाळला”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More