मुंबई | हिंदूंच्या सणांवर लागणाऱ्या नियमांवरून शिवसेनेनं राज्य सरकार, प्रशासन, आणि न्यायव्यवस्थेवर टीका केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं निशाणा साधला आहे.
हिंदूंचे सण आले की नवी फरमाने निघतात. मुर्त्यांना फुटपट्ट्या लागतात. त्यांचे मंडप घालायचे की नाही, घातले तर आकार काय असावा, अशी मापं लागतात. जे न्यायालय हिंदूंच्या राममंदिराबाबत गेल्या 25 वर्षांत निर्णय देऊ शकलं नाही, ते न्यायालय हिंदू सण-उत्सवाबाबत मार्गदर्शक नियमावली तयार करते. या नियमावलीच्या जोरावर नोकरशाही गणेशोत्सवाला आडवी जाते, असं अग्रलेखात म्हटलं आहे.
हा एक प्रकारे ‘अॅट्रॉसिटी’चाच प्रकार आहे, पण हिंदूंच्या सण- उत्सवांवरील अत्याचार तुमच्या त्या अॅट्रॉसिटी कायद्यात मोडत नाहीत. त्यामुळे देवाधिराज गणरायही मुकाटपणे हे अत्याचार सहन करतात, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.
दरम्यान, गिरगावात पालिकेच्या अधिकाऱ्यानं गणेशोत्सवाचा मंडप उखाडला. या मुद्द्यावरून शिवसेनेनं टीका केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-परळी म्हणजे महाराष्ट्र नव्हे; मराठा क्रांती मोर्चाची आक्रमक भूमिका
-तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करूणानिधींचं निधन!
-…अखेर मराठा मोर्चेकऱ्यांकडून आंदोलन मागे घेण्याचा निर्णय!
-पुण्याला मिळणार राज्यसभेच्या उपसभापतीपदाचा मान?
-‘आरएसएस’मध्ये महिलांसाठी दरवाजे कायमचे बंद असतात- राहुल गांधी