बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठा समाजासाठी हा दुर्दैवी दिवस – संभाजीराजे भोसले

नवी दिल्ली | मागील 6 वर्षांपासून रखडलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आज निर्णय झाला. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा मोठा निर्णय दिला आहे. मराठा आरक्षण देण्यासंदर्भात स्थिती राज्यात निर्माण झालेली नाही, असं निरीक्षण नोंदवत सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण कायदा रद्द केला आहे, असं मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सांगितलं आहे.

मराठा समाजासाठी हा दुर्दैवी दिवस आहे. हा निर्णय मराठा समाजासाठी दुर्दैवी आहे. सर्व सरकारांनी त्यांची बाजू मांडली आहे. मागील सरकारनं कायदा मंजूर केला. सगळ्यांनी आपली बाजू मांडली. शेवटी निकाल हा निकाल असतो, असं खासदार संभाजीराजे भोसले यांनी सांगितलं आहे.

2007 पासून प्रामाणिकपणे लढतोय. सध्याची परिस्थिती वाईट आहे. कोरोनामुळं लोक मरत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे. आपलं काम प्रयत्न करणं आहे.  केंद्र आणि राज्य सरकारनं यातून मार्ग निघतोय का हे पाहावं. यावर अभ्यास होणं गरजेंचं आहे, असं देखील संभाजीराजेंनी सांगितलं आहे.

दरम्यान, केंद्र सरकारनं देखील या प्रकरणात लक्ष घालण्याची गरज आहे, असं देखील खासदार संभाजीराजे भोसले म्हणाले आहेत. तर मराठा आरक्षणासाठी मोठ्या बेंचकडे जाण्याची गरज नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. त्यामुळे एकप्रकारे आता मराठा आरक्षणासाठी सर्व दरवाजे बंद होताना दिसत आहे.

थोडक्यात बातम्या-

मराठा आरक्षण रद्द; सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा निर्णय!

‘…तर पुन्हा रॅपिड अँटीजेन आणि RTPCR चाचणी करण्याची गरज नाही’

शिवसेनेला रामराम ठोकत ‘या’ बड्या नेत्याची दोन वर्षांतच काँग्रेसमध्ये घरवापसी

तरुणीने सॅनिटायजर पिऊन कापली हाताची नस; नाशिकमध्ये एकच खळबळ

नियतीने किती निष्ठूर व्हावं? मुलीनं काढलं चित्र, मात्र पहायला आता बापच राहिला नाही!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More